एक्स्प्लोर
PF New Rule: EPFO खातं आधार कार्डला लिंक केलंय का? नसेल तर आपला प्रॉव्हिडंट फंड होणार बंद
EPFO Aadhaar Link : कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं आपल्या नियमांत बदल केला असून यापुढे आधार कार्ड (Aadhaar) जर EPFO खात्याला लिंक नसेल तर आपला प्रॉव्हिडंट फंड (PF) मिळणार नाही.
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक करणं बंधनकारक केलं आहे. जर कोणी खातेधारक आधार लिंक करणार नाही तर त्याला आता प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही. हा नियम 1 जूनपासून लागू करण्यात आला आहे.
आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक केलं नसेल तर ECR (Electronic Challan cum Return) दाखल होणार नाही, त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला त्याचा प्रॉव्हिडंट फंड मिळणार नाही. सर्व पीएफ धारकांचे खाते युएएन (UAN) सोबत व्हेरिफाईड होणं अत्यावश्यक आहे.
EPFO has amended ECR filing protocol and from 01.06.2021 it can be filed only with respect to Aadhaar seeded UAN's.#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/8KCAmRMNEC
— EPFO (@socialepfo) June 7, 2021
अशा पद्धतीने आपल्या EPFO खात्याशी आधार लिंक करु शकता.
- सर्व प्रथम EPFO पोर्टल epfindia.gov.in यावर भेट द्या.
- epfindia.gov.in वर लॉगइन करा.
- Online Services ऑप्शन मध्ये e-KYC portal या ठिकाण जा आणि Link UAN Aadhaar यावर क्लिक करा.
- UAN नंबर आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाका.
- EPFO च्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
- तो ओटीपी नंबर आणि आपला 12 अंकी आधार नंबर नोंद करा.
- त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
- हे झाल्यानंतर OTP Verification या पर्यायावर क्लिक करा.
- आधारच्या व्हेरिफिकेशनसाठी आपल्या आधार नंबरवर असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी नोंद करा.
त्यानंतर आपले EPFO खातं आधारशी लिंक होईल.
महत्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement