एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मागील 10 महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात 15 रुपयांची दरवाढ
मुंबई : काल मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात कालपासून 42 पैसे प्रतिलीटर तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 1.03 रुपये एवढी वाढ करण्यात आली आहे. काल रात्रीपासून झालेल्या दरवाढीनंतर गेल्या 10 महिन्यात जवळपास 15 रुपयांची वाढ झाली आहे.
मागील सहा आठवड्यांमध्ये पेट्रोलची ही सलग चौथी दरवाढ आहे, तर डिझेलची तिसरी दरवाढ आहे. तेल कंपन्यांनी जाहीर केलं आहे, की या दरवाढीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारनं लावलेला कर अंतर्भुत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील तेल उत्पादन कंपन्यांनी दर वाढवले आहेत.
काल रात्रीपासून पेट्रोलच्या किंमतीत 42 पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपया 3 पैशांनी वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपया 29 पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लीटर एवढी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. 17 डिसेंबरला पेट्रोल 2 रुपये प्रति लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपया 79 पैशांनी वाढ झाली होती.
मार्च 2017 मध्ये पेट्रोलची किंमत सर्वात कमी होतं. त्यानंतर सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दहा महिन्यात तब्बल 15 रुपयांनी इंधन महागलं आहे.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement