एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल 74 पैशांनी, तर डिझेल 1 रुपया 30 पैशांनी स्वस्त
नवी दिल्ली : महागाईला वैतागलेल्या जनतेला किंचीतसा दिलासा मिळाला आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल 74 पैशांनी स्वस्त झालं आहे, तर डिझेलच्या दरातही 1 रुपया 30 पैशांची कपात झाली आहे.
नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
दहा दिवसांपूर्वीच म्हणजेच 5 एप्रिललाच पेट्रोल प्रति लिटर 2.19 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 98 पैशांनी महागलं होतं. त्या तुलनेत इंधनाच्या दरात झालेली कपात खूपच कमी आहे.
तसंच 16 मार्च रोजीही पेट्रोलचे 3.07 रुपयांनी आणि डिझेलचे दर 1.90 रुपयांनी वाढवण्यात आले होते. तर 17 फेब्रुवारीला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल केले होते. तेव्हा पेट्रोलचे दर 32 पैशांनी स्वस्त झाले होते. मात्र डिझेल 28 पैशांनी महागलं होतं.
संबंधित बातमी
पेट्रोल भरताना तुमची अशी फसवणूक तर होत नाही ना?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement