Petrol Diesel Price Hike : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले, जाणून घ्या काय आहेत आजचे नवे दर
Petrol Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच आहे. गेल्या 12 दिवसांत इंधन 10व्यांदा इंधन दरात वाढ झाली आहे.
Petrol Diesel Price Hike : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर एक दिवस स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा वाढले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 80 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 117.57 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 101.70 रुपये प्रतिलीटरवर पोहोचला आहे. तसेच दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 102.61 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 93.87 प्रतिलीटरवर पोहोचली आहे. 31 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलचे दर प्रतिलीटर 80 पैशांनी महागले होते. त्यानंतर आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी इंधन दर स्थिर होते.
चार महिन्यांहून अधिक कालावधीनंतर 22 मार्चपासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ कायम आहे. त्यानंतर गेल्या 12 दिवसांत इंधन दहाव्यांदा पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. अलिकडे कच्च्या तेलाच्या किमती 35 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील 85 टक्के इंधन पुरवठा आयातीवर अवलंबून आहे.
मुंबई
पेट्रोल - 117.57 रुपये प्रति लिटर
डिझेल - 101.79 रुपये प्रति लिटर
दिल्ली
पेट्रोल - 102.61 रुपये प्रति लिटर
डिझेल - 93.87 रुपये प्रति लिटर
कोलकाता
पेट्रोल - 112.19 रुपये प्रति लिटर
डिझेल - 97.02 रुपये प्रति लिटर
कोणत्या दिवशी किती वाढले दर?
22 मार्च - 80 पैसे
23 मार्च - 80 पैसे
25 मार्च - 80 पैसे
26 मार्च - 80 पैसे
27 मार्च - 50 पैसे
28 मार्च - 30 पैसे
29 मार्च - 80 पैसे
30 मार्च - 80 पैसे
31 मार्च - 80 पैसे
02 एप्रिल - 80 पैसे
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चच्या मते, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9 ते 12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Metro : मुंबईकरांना गुढीपाडव्याची भेट! आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण; देवेंद्र फडणवीसांना निमंत्रणच नाही
- Gudi Padwa 2022 : राज्यभरात गुढी पाडव्याचा उत्साह, दोन वर्षांनंतर पाहायला मिळणार शोभायात्रांची धूम
- Aryan Khan Case : मोठी बातमी! मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha