एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डीझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 2.58 रुपयांनी वाढले असून डिझेल 2.26 रुपयांनी महागलं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे. यापूर्वी 17 मे रोजी पेट्रोल 0.83 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 1.26 रुपये प्रति लिटर महागलं होतं. तर त्या याआधी 30 एप्रिलला पेट्रोलचे दर प्रति लिटर 1.06 रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर 2.94 रुपयांनी वधारले होते. तसंच 5 एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यात आले होते.
दरम्यान देशात 1 जूनपासून कृषी कल्याण सेस लागू होत असल्यामुळे सर्व्हिस टॅक्स 14.5 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांवर जाणार आहे. मोबाईल, डीटीएच, वीज, पाणी यांचं बिल, रेस्टॉरंटमधील जेवण, रेल्वे आणि विमानाचं तिकीट, बँकिंग, विमा सेवा महागणार आहेत. बँक ड्राफ्ट, फंड ट्रान्सफर, एसएमएस अलर्ट, चित्रपट, स्पा, सलून, पार्लर यासारख्या सेवाही महागतील. आता पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement