एक्स्प्लोर
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ
नवी दिल्ली : वाहनचालकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. कारण पेट्रोलच्या किंमतीत 42 पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपया 3 पैशांनी वाढ झाली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलच्या किंमतीत 1 रुपया 29 पैशांनी, तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लीटर एवढी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतातील तेल उत्पादन कंपन्यांनी दर वाढवले आहेत. 17 डिसेंबरला पेट्रोल 2 रुपये प्रति लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपया 79 पैशांनी वाढ झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement