(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Price Today : रशिया-युक्रेन युद्धामुळं देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम? जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today 4 March 2022 : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती कडाडल्या. देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांची स्थिती काय?
Petrol-Diesel Price Today 4 March 2022 : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात युद्धाला विराम मिळण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. लवकरच दोन्ही देशांमध्ये तिसऱ्या फेरीची चर्चा होण्याची शक्यता आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळं सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil Price) सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती 110 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचल्या आहेत. कच्च्या तेलानं सात वर्षांतील सर्वोच्च पातळीवर गाठली आहे. पण, आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीचा देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर (Petrol-Diesel Price) कोणताही परिणाम झाल्याचं दिसत नाहीये. भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. देशांतील सर्व महानगरांमध्ये चार महिन्यांपासून दरांत कोणतेही बदल झालेले नाहीत.
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीने 110 डॉलर प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडला आहे. त्याचा परिणाम देशातील इंधनावर होण्याची शक्यता आहे. पण सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. अशातच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर, म्हणजे 7 मार्च नंतर देशातील पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel) किंमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 9 ते 10 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे भाव 110 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑईल 110 डॉलर प्रति बॅरेल तर डब्ल्यूटीआय ऑईलच्या किंमती 108 डॉलर प्रति बॅरेल पार पोहोचल्या आहेत. डब्ल्यूटीआय ऑईल ऑगस्ट 2014 नंतर पहिल्यांदाच 108 डॉलर प्रति बॅरेल पार पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.