एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : दोन दिवसांनी आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल; मुंबईत विक्रमी वाढ

Petrol, Diesel Price Today : आज पुन्हा पेट्रोल-डिझेल कडाडलं. पेट्रोलचे दर 25 पैसे आणि डिझेलचे दर 37 पैशांनी वाढले. देशात सर्वाधिक दर मुंबईत.

Petrol, Diesel Price Today : दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आज म्हणजेच, बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या आहेत. भारतीय तेल कंपन्या IOC, HPCL आणि BPCL नं बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर 25 पैसे आणि डिझेलचे दर 37 पैशांनी वाढवले आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून 107.94 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत आता 96.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. 

भारतीय तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 113.80 रुपयानंव विकलं जात आहे, तर डिझेल 104.75 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोल-डिझेलचे दर मुंबईत आहेत. तर कोलकातामध्ये पेट्रोल 108.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 99.78 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये 104.83 प्रति लिटरनं पेट्रोल विकलं जात आहे. तर डिझेल 100.92 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. 

देशातील महानगरांतील दर काय? 

आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय जाणून घ्या

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली   107.94 96.67
मुंबई  113.80 104.75
कोलकाता  108.45 99.78
चेन्नई  104.83 100.92

पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? 

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 

देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget