Petrol Diesel Price : क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये मोठी वाढ; देशांतंर्गत पेट्रोल-डिझेलचे दर काय?
Petrol-Diesel Price Today 26 Januvary 2022 : आजही इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Petrol-Diesel Price Today 26 Januvary 2022 : आज देशाचा प्रजासत्ताक दिन. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरी पार आहेत. देशात तेलाचे दर अद्यापही सामान्य माणसांच्या खिशावर भार आणत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतरही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत. देशात आज 26 जानेवारी, 2022 रोजीही कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅट (VAT) च्या वेगवेगळ्या दरांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत.
देशात निवडणुकीनंतर इंधन दरवाढीचा भडका?
सध्या देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 14 राज्यांमधील 30 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी रात्री केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 80 दिवस इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर इंधन कंपन्या दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात सरकारची भूमिका नाही, असे अनेकदा सरकारकडून म्हटले जाते. मात्र निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 रुपये प्रति लिटर | 94.14 रुपये प्रति लिटर |
ठाणे | 110.12 रुपये प्रति लिटर | 94.28 रुपये प्रति लिटर |
पुणे | 109.72 रुपये प्रति लिटर | 92.50 रुपये प्रति लिटर |
नाशिक | 109.79 रुपये प्रति लिटर | 92.57 रुपये प्रति लिटर |
नागपूर | 110.10 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
कोल्हापूर | 109.66 रुपये प्रति लिटर | 92.48 रुपये प्रति लिटर |
अहमदनगर | 110.12 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
अमरावती | 111.14 रुपये प्रति लिटर | 93.90 रुपये प्रति लिटर |
देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय?