एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today Latest Updates : गेल्या 16 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट होण्याऐवजी आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Petrol-Diesel Price Today Latest Updates : पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Rate) आज म्हणजेच, 21 सप्टेंबर 2021 रोजी सलग सोळाव्या दिवशी स्थिर आहे. तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमतींमध्ये कोणताही फेरबदल केलेला नाही. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (IOCL) दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलचे दर 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तसेच देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा झाली. परंतु, पेट्रोल-डिझेल  GST कक्षेत आणण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं पुन्हा एकदा सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट होण्याऐवजी आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, देशात 5 सप्टेंबरनंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. देशाच्या राजधानीच्या शहरात पेट्रोलच्या किमती 101.19 रुपये आणि डिझेलच्या किमती 88.62 रुपये प्रति लिटरवर स्थित आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 96.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती 101.62 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 91.71 रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती 98.96 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 93.26 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील चार महानगरांची तुलना केली, तर पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. 

देशातील प्रमुख शहरांतील दर : 

शहर  पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली 101.19 88.62
मुंबई 107.26 96.19
चेन्नई 98.96 93.26
कोलकाता 101.62 91.71
भोपाळ 109.63 97.43
रांची 96.21 93.57
बंगळुरु 104.70 94.04
पाटना 103.79 94.55
चंदिगड 97.40 88.35
लखनौ 98.30 89.02
नोएडा 98.52 89.21

सप्टेंबरमध्ये दोन वेळा घटल्या पेट्रोल-डिझेलच्या किमती 

सप्टेंबर महिन्यात दोन वेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच, 1 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत 15-15 पैसे प्रति लिटरची कपात केली होती. तसेच, 05 सप्टेंबर रोजी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 15-15 पैशांची घट झाली होती. म्हणजेच, या आठवडाभरता पेट्रोल-डिझेल 30-30 पैशांनी स्वस्त झाला आहे. 

जुलै महिन्यातील वाढ

जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या किमती 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच जुलै महिन्यात एका दिवशी डिझेलच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यापूर्वी मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती. 4 मेनंतर आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 11.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 09.14 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Plane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशाराABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 30 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
Embed widget