एक्स्प्लोर

Petrol Diesel Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट; देशातील किमतीही लवकरच कमी होणार?

Petrol-Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 18th August 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड 94 डॉलर्सच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या दरांत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) नव्या किमती जाहीर केल्या आहेत. आज 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel) स्थिर आहेत. 

आजचे कच्च्या तेलाचे दर काय?  

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 88 डॉलर्सच्या खाली घसरले आहेत. WTI क्रूड प्रति बॅरल 87.83 डॉलरवर व्यापार करत आहे. ब्रेंट क्रूडची खरेदी प्रति बॅरल 93.49 डॉलर या दरानं होत आहे.

मोदी सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. तर राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 January 2025Pune Chain Snatching Special Report : साखळी चोरांचा उन्माद, पुणेकरांवर ब्यादPadma Shri Award News :  अशोक सराफ, अरिजीत सिंगला पद्मश्री पुरस्कार; केंद्र सरकारकडून सन्मानAshok Saraf Padma Shri Award : पद्मश्री पुरस्काराने सन्मान,अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
सहा दशकं जंगलात, पुरस्काराचं श्रेय गुरुजन, पत्नी आणि निसर्गाला, पद्मश्री पुरस्कारानंतर मारुती चित्तमपल्ली भावूक
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Embed widget