एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : आजचे इंधनाचे दर जारी; 'या' शहरात सर्वात महाग पेट्रोल, इतर शहरांतील स्थिती काय?

Petrol-Diesel Price Today 13 January 2022 : आजही इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price Today 13 January 2022 : देशातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी करण्यात आले आहेत. भारतीय तेल कंपन्यांकडून आज 13 जानेवारी 2022 साठीचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी करण्यात आले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून देशाची राजधानी दिल्ली आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. याशिवाय अन्य महानगरांतही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, असं असलं तरी देशातील इंधनाचे दर ऐतिहासिक पातळीवर आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. 

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे. महानगरांबाबत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Rate) सर्वात स्वस्त आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या किमतींमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलनं शतक पार केलं आहे. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

देशातील महानगरांतील आजचे दर :

देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

दरम्यान, केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.