मुख्यपृष्ठबातम्याभारतPetrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा कच्च्या तेलावर परिणाम; महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?
Petrol Diesel Price : रशिया-युक्रेन युद्धाचा कच्च्या तेलावर परिणाम; महिन्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?
Petrol-Diesel Price Today 1 March 2022 : रशिया-युक्रेन युद्धामुळं जग चिंतेत. कच्च्या तेलाच्या किमती सर्वोच्च पातळीवर, देशातील परिस्थिती काय?
By : एबीपी माझा वेब टीम | Edited By: श्रद्धा भालेराव | Updated at : 01 Mar 2022 08:00 AM (IST)
Petrol Diesel Price Today 1 March 2022
Petrol-Diesel Price Today 1 March 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. जगाची चिंता वाढवणाऱ्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर (Crude Oil) वाढले आहेत. असं असलं तरीही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. राष्ट्रीय बाजारात गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel Price) स्थिर आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका सुरु आहेत. 10 मार्च रोजी पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जारी करण्यात येणार आहे. त्यामुळे 10 मार्चपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते.
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती तीन महिन्यांपासून स्थिर आहेत. अशातच देशात निवडणुकांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. देशातील सर्वच महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. मुंबईत पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
देशातील महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha