एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणाम होणार?

Petrol Diesel Price in Mumbai Today 24 June 2022 :

Petrol Diesel Price in Mumbai Today 24 June 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) आजचे नवे दर जाहीर केले आहेत. आज म्हणजेच, 24 जून शुक्रवारी पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या नव्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. असं असलं तरीही सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Diesel Price) कोणतीही वाढ, अथवा घट करण्यात आलेली नाही. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ उतार सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आज, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 110.7 डॉलरवर पोहोचली आहे, तर यूएस क्रूड WTI प्रति बॅरल 105 डॉलरपेक्षा जास्त किंमतीला विकत आहे. कच्च्या तेलाची किंमत एका दिवसापूर्वीच्या किंमतीपेक्षा सुमारे 1 डॉलरनं महाग झाली आहे. मात्र, आज सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. 

देशातील महानगरांतील दर

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah will Meets Sharad Pawar : अजितदादांनंतर आता अमित शाह शरद पवारांची भेट घेणारMaharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागतABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
Embed widget