एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today : महंगाई डायन खाए जात है... सलग तिसऱ्या दिवशी कडाडले पेट्रोल-डिझेलचे दर, मुंबईत उच्चांक

Petrol Diesel Price 22 Oct 2021 : देशात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची हॅट्रिक झाली असून आज पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रत्येकी 35 पैसे प्रति लिटरनं वाढल्या आहेत.

Petrol Diesel Price 22 Oct 2021 : देशात सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 35-35 पैसे प्रति लिटरनं महागलं आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत वाढून 106.89 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर डिझेलची किंमत आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. दिल्लीत डिझेलच्या किमती 35 पैशांनी वाढून 95.62 रुपये प्रति लिटर झाली आहे. 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलची किंमत आता 112.78  रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर डिझेलची किंमत 103.63 रुपये प्रति लिटर झाली आहे. देशातील सर्व मोठ्या महानगरांपैकी पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती क्रमशः 107.45 रुपये प्रति लिटर आणि 103.92 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 98.73 रुपये प्रति लिटर आणि 99.92 रुपये प्रति लिटर आहे. 

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या बाढीबाबत बोलायचं झालं तर, गेल्या 28 दिवसांपैकी 22 दिवस डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. ज्यामुळे दिल्लीमध्ये त्याच्या किरकोळ किमतीत सुमारे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. इंधन आता देशातील अनेक भागांत 100 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. पेट्रोलच्या किमतींमध्ये गेल्या 24 दिवसांमध्ये 19 दिवस वाढ झाली. त्यामुळे याच्या किमतींमध्ये 5.70 रुपये प्रति लिटरनं वाढ झाली आहे. 

देशातील प्रमुख महानगरांतील दर :

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली   106.89 95.62
मुंबई  112.78 103.68
कोलकाता  107.44 98.78
चेन्नई  103.92 99.92
 

पेट्रोल-डिझेलच्या दरांत का होतेय सातत्यानं वाढ? 

जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होणं, सामान्य बाब आहे. 

देशात अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :13 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaJustice Chandiwal : न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या गौप्यस्फोटावर अजितदादा,सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSanjay Shirsat on Justice Chandiwal | अनिल देशमुखांना क्लीनचिट देण्याचा प्रश्नच येत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam on Sanjay Raut : संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
संजय राऊतांच्या अंगात येऊन सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातील उतरलंच नसल्याने सरकार गेलं; विश्वजित कदमांची टीका
Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर
Ajit Pawar on Yugendra Pawar : मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
मला इंग्लिश न येऊनही राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवा म्हणावं; बारामतीतूनच अजितदादांचा सणसणीत टोला
Rohit Pawar: अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुखांच्या क्लिनचिट प्रकरणी जस्टीस चांदीवालांवर भडकले रोहित पवार, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी..
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
Embed widget