Rahul Gandhi : इंधन दरवाढ: राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका, म्हणाले...
Rahul Gandhi on Fuel Price Hike : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
Rahul Gandhi on Fuel Price Hike : मागील 9 दिवसात आठव्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. इंधन दरवाढ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य लोकांचा खिसा रिकामा होऊ लागल्याने रोष निर्माण होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले की, पंतप्रधान दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोजच्या कामांपैकी (Do Do List)काही कामे ठरली आहेत. यामध्ये,
> पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर वाढवणे
> वाढत्या महागाईवरून लोकांची चर्चा कशी थांबवू
> युवकांना रोजगार देण्याची पोकळ स्वप्नं कशी दाखवू
> आज कोणती सरकारी कंपनी विकू
> शेतकऱ्यांना आणखी लाचार कसे करू
प्रधानमंत्री की Daily To-Do List
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 30, 2022
1. पेट्रोल-डीज़ल-गैस का रेट कितना बढ़ाऊँ
2. लोगों की ‘खर्चे पे चर्चा’ कैसे रुकवाऊँ
3. युवा को रोज़गार के खोखले सपने कैसे दिखाऊं
4. आज किस सरकारी कंपनी को बेचूँ
5. किसानों को और लाचार कैसे करूँ#RozSubahKiBaat
आदी पंतप्रधानांच्या दररोजच्या कामांचा भाग असलेली ही यादी असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. पाच राज्यातील मतदान संपल्यानंतर इंधन दरवाढ होणार असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक ऑफर संपली असल्याची टीका त्यांनी केली होती.
दरम्यान, दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. महागाई गगनाला भिडली आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचे भाव 108 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. 22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. नऊ दिवसात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 5.60 रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha