Petrol and diesel prices Today: सलग अकराव्या दिवशी इंधन दरवाढ, मुंबईत पेट्रोल 97 रुपये तर डिझेल 88 रुपये
Petrol and diesel prices Today: देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती सलग अकराव्या दिवशी वाढल्या असून मुंबईत पेट्रोल 97 रुपये तर डिझेल 88 रुपयावर पोहचलं आहे.
Petrol-Diesel Price: देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढलं असून ते 97 रुपयावर पोहचलं आहे तर दिल्लीत पेट्रोलची किंमत या 31 पैशानी वाढली असून ती 90 रुपये 19 पैशावर पोहचली आहे.
डिझेलच्याही किंमती वाढल्या असून मुंबईत डिझेल 88 रुपये तर दिल्लीत 86.60 रुपयांवर पोहचलं आहे. या महिन्यात 13 व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीत गेल्या दहा दिवसात पेट्रोल 3.24 रुपयांनी तर डिझेल 3.49 रुपयांनी वाढलं आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेल्याच्या किंमतीतही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत 65 डॉलर प्रति बॅरेल इतकी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय वायदे बाजार इंटरक टिनेन्टल एक्सचेन्जमध्ये गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत 1.21 रुपयांची वाढ झाली असून ते 65.12 डॉलरवर पोहचल्याचं दिसून आलंय. न्यूयॉर्क मर्केंटाईल एक्सचेन्ज (नायमॅक्स) वर कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.96 टक्क्यांची वाढ होऊन ती 62.27 डॉलरवर पोहचली आहे.
केंद्र सरकार सध्या पेट्रोलवर 32.90 रुपये एक्साइज कर लावत आहे. सध्यातरी या करामध्ये कोणतीही कपात करण्याचा विचार नसल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी तसं संसदेत सांगितलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच पेट्रोलच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर 65 डॉलरवर गेल्या आहेत.