एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today : देशात पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? एक लिटरसाठी किती पैसे द्यावे लागणार?

Petrol-Diesel Price 03 January 2022 : इंधन कंपन्यांनी नववर्षाच्या तिसऱ्या दिवशी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price 03 January 2022 : नववर्षांची सुरुवात झाली आहे. परंतु, देशांतर्गत इंधन बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.16 टक्क्यांनी घसरून $79.40 वर आली होती. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड फ्युचर्सची किंमत 0.74 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $ 78.94 वर आली. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती न्यूयॉर्कमध्ये 0.23 टक्क्यांनी घसरून 76.81 डॉलर प्रति बॅरलवर आल्या होत्या. 

देशात गेल्या दोन महिन्यांपासून तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

देशात सर्वाधिक दर कोणत्या शहरात 

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे. महानगरांबाबत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Rate) सर्वात स्वस्त आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या किमतींमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलनं शतक पार केलं आहे. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

देशात ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी इंधानाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जाणून घेऊया वेगवेगळ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती 

देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल, मुख्य लढती कोणत्या?, A टू Z माहिती
Election Result : कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
Embed widget