(Source: Poll of Polls)
Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून ‘वैयक्तिक हल्ल्याचा’ निषेध
Nupur Sharma : नूपूर शर्मा यांना फटकारणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेल्या न्यायमूर्तींनी त्यांच्या निर्णयासाठी होणारे वैयक्तिक हल्ले धोकादायक परिस्थिती निर्माण करत असल्याचे म्हटले आहे.
Nupur Sharma : नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले होते. नुपूर शर्मा यांनी प्रेषितांवर केलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले होते. तेव्हापासून न्यायमूर्तींच्या वैयक्तिक हल्ले होत आहेत.
नूपूर शर्मा यांना फटकारणाऱ्या खंडपीठाचा भाग असलेल्या न्यायमूर्तींनी वैयक्तिक हल्ल्याचा निषेध केला आहे. न्यायमूर्ती जे.बी.पारदीवाला (Jamshed Burjor Pardiwala) यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, "न्यायमूर्तींवर त्यांच्या निर्णयासाठी होणारे वैयक्तिक हल्ले धोकादायक परिस्थिती निर्माण करतात. न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत या दोघांनीही त्यांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नुपूर शर्मा यांच्याविरोधात केलेल्या तोंडी टिप्पणीनंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.
नुपूर शर्मा यांनी सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली होती की, त्यांच्याविरुद्ध देशभरात नोंदवलेल्या सर्व एफआयआर एकत्र करून दिल्लीला हस्तांतरित करण्यात यावेत. आपल्या याचिकेत असेही म्हटले आहे की, त्यांना आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षेला धोका आहे आणि त्यांना संरक्षणाची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांना अटक का केली नाही? असा सवालही केला होता आणि त्यांना “देशभरातील भावना भडकावल्याबद्दल” जबाबदार धरले होते.
नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना म्हटले की, तुम्ही स्वत: वकील असल्याचे सांगता. मात्र, तरीदेखील तुम्ही बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलं आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरता कामा नये असेही खडे बोल सुप्रीम कोर्टाने सुनावले. सुप्रीम कोर्टाने संबंधित वृत्तवाहिनीलादेखील सुनावले. या वृत्तवाहिनीच्या चर्चा कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने भडकवण्याचे काम केले तर त्यांच्या विरोधात गु्न्हा दाखल का करू नये असेही कोर्टाने विचारले.
सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना खडे बोल सुनावताना म्हटले की, तुमच्यामुळे देशातील वातावरण खराब झाले आहे. तुम्ही माफीदेखील उशिरा मागतिली. ही माफीदेखील अटींसह असल्याचे कोर्टाने म्हटले. कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारताना म्हटले की, नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये पहिल्यांदा एफआयआर नोंदवण्यात आला. मग, त्याविरोधात तुम्ही कारवाई का केली नाही, असा सवाल कोर्टाने केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या