(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parliament Security Breach : लोकसभेत आंदोलन प्रकरणी आणखी एकजण अटकेत; पोलिसांनी जप्त केले काही मोबाईल फोन
Lok Sabha Security Breach : संसदेतील सुरक्षा व्यवस्था भंग करून लोकसभेत आंदोलन केल्या प्रकरणी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपास पथकाने आरोपीचा जळालेला मोबाईल फोन, कपडे आणि बूट देखील जप्त केले आहेत.
Parliament Security Breach : संसद सुरक्षा भंग करून लोकसभेत आंदोलन (Security Breach in Lok Sabha) केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आणखी एकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी महेश कुमावत (Mahesh Kumawat) या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपास पथकाने आरोपीचा जळालेला मोबाईल फोन, कपडे आणि बूट देखील जप्त केले आहेत.
या अटकेनंतर महेश कुमावतला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले, कोर्टाने कुमावतला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी 15 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, कोर्टाने सात दिवसांचीच कोठडी सुनावली.
महेशचे इन्स्टाग्राम डीकोड करून तपास पथकाने अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. महेशवर तरुणांना भडकावण्याचा तसेच व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप आहे. तो त्याच्या इन्स्टाग्रामवर क्रांतिकारकांची छायाचित्रे पोस्ट करत असे.
कटात महत्त्वाची भूमिका बजावली
आरोपी महेश कुमावत याने ललित झा याला लपून राहण्यास मदत केली होती. संसदेची सुरक्षा व्यवस्था छेदून लोकसभेत आंदोलन करण्याच्या कटात आरोपी महेश कुमावत याचाही मोठा वाटा आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ही बाब उघड झाली आहे. तो केवळ आरोपींना रसद पुरवत नव्हता तर या गटात आणि कटातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.
आरोपी करत होते अनेक दिवसांपासून कट
आरोपींनी चौकशी दरम्यान दिल्ली पोलिसांना सांगितले की, ललित झा हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड होता. सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले होते आणि एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. ही घटना घडवण्यासाठी हे लोक अनेक दिवसांपासून नियोजन करत होते.
सभागृहात अटक करण्यात आलेल्या मनोरंजन डी यांनी पोलिसांना सांगितले की, तो मार्च 2023 मध्ये संसद भवनात सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी गेला होता. संसद भवनातील रेकी केल्यानंतर कट आखला. तर, सभागृहात अटक करण्यात आलेल्या सागर शर्मालाही मार्च महिन्यात सभागृहात जायचे होते, मात्र त्याला त्यावेळी पास मिळाला नाही.
पोलिसांच्या चौकशीत या आरोपींनी अनेक गौप्यस्फोट केले. त्यांनी सांगितले की, मार्चमधील रेकिच्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, सभागृहात जाण्यापूर्वी कसून तपासणी केली जाते, परंतु शूजची तपासणी होत नाही. या कारणांनी त्यांनी आपल्या शूजमध्ये स्मोक स्टिकमध्ये घेऊन गेले.