(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : पण हे का घडलं? बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल, संसदेच्या सुरक्षेबाबत राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi : संसदेत सुरक्षेचा भंग झाल्याप्रकरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिलीये. यावेळी त्यांनी बेरोजगारीची मुद्दा उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली : संसदेच्या (Parliament) सुरक्षेतील त्रुटींबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शनिवारी 16 डिसेंबर रोजी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, यामागील बेरोजगारी आणि महागाई ही कारणे आहेत. सुरक्षेमध्ये त्रुटी आहे, पण असे का झाले? सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा, ज्यावरून संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भारतातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवदेनाची मागणी देखील विरोधी पक्षांकडून केली जातेय. तसेच भाजपच्या नेतेमंडळींकडून अमित शाह याबाबत लवकरच निवदेन देतील असं सांगण्यात येतंय. या प्रकरणातील मुख्य आरोपीला आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. यामुळए विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतयं. तसेच सरकारने या प्रकरणात चौकशीचे आदेशही दिले आहेत.
#WATCH | On Parliament security breach incident, Congress MP Rahul Gandhi says, "Why did this happen? The main issue in the country is unemployment. Due to the policies of PM Modi, the youth of the country are not getting employment and the reason behind (this incident) is… pic.twitter.com/iVNrp6xtpv
— ANI (@ANI) December 16, 2023
नेमकं प्रकरण काय?
लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावू लागले. संसदेत विषारी धूर सोडला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदार कोटकांनी पकडलं. या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षा यंत्रणेवर मात्र प्रश्न उपस्थित झाले. धक्कादायक बाब म्हणजे खासदाराच्या प्रताप सिम्हा यांच्या पासवर हे दोन्ही तरुण सभागृहात शिरले. खासदारार प्रताप सिम्हा हे भाजपचे नेते आहेत. त्यांच्याच शिफारसीवर आरोपीचा पास तयार करण्यात आला होता त्यामुळे या अनुशंगानेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
बुधवार 13 डिसेंबर रोजी संसदेत (Loksabha) घुसखोरीचा कथित सूत्रधार ललित झा (Lalit Jha ) याला चौकशीसाठी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची 15 दिवसांची कोठडी मागितली होती. उल्लंघन केल्यापासून फरार असलेल्या झा याने गुरुवार रात्री दिल्लीत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. बिहारचा असलेला ललित झा कोलकाता येथे शिक्षक म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.