एक्स्प्लोर
सूरतमध्ये 50 हजारांच्या नकली नोटांसह पाकिस्तानी नागरिकाला अटक
सूरत: सूरतमध्ये 50 हजाराच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नोटा जुन्या 500 रुपयांच्या आहेत. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली असून तो पाकिस्तानी नागरिक असल्याचं समजतं आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचं नाव बुरहानुद्दीन सज्जाद असून तो पाकिस्तानच्या कराचीमधील रहिवासी आहे. आपल्याला अमृतसरमध्ये हे पैसे कुणीतरी दिलं असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं.
500च्या नकली नोटांसह बुरहानुद्दीनकडे 300 डॉलर, एक पासपोर्ट, मोबाइल आणि दोन पाकिस्तानी सिम कार्ड आणि एक भारतातील सिम कार्ड मिळालं आहे. पोलिसांच्या मते, बुरहानुद्दीनकेड व्हिझिटर व्हिसा आहे. तो 12 डिसेंबरला कराचीहून निघाला होता. त्यानंतर लाहोरमार्गे अमृतसरहून तो मुंबईला जात होता.
पोलिसांच्या मते, बुरहानुद्दीन हा पाकिस्तानमध्ये आपल्या वडिलांसोबत व्यवसाय करतो. दरम्यान, त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक चौकशी सुरु केली आहे. तसेच त्याचा भारतात कोणा-कोणाशी संबंध आहे याचा देखील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement