सचिन-सीमाची प्रेमकहाणी संपणार? प्रेमासाठी भारतात आलेल्या सीमा हैदरचं काय होणार? ती पाकिस्तानात जाणार?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) भारताने पाकिस्तानवर कडक कारवाई सुरु केलीय. त्यामुळं प्रेमासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचं काय होणार अशी चर्चा सुरु आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack ) भारताने पाकिस्तानवर कडक कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या CCS बैठकीत पाकिस्तानविरोधात पाच मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. एका निर्णयात भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. यासोबतच सार्क व्हिसा एक्झम्प्शन स्कीम (SVES) देखील तात्काळ प्रभावाने बंद करण्यात आली आहे. SVES व्हिसाच्या अंतर्गत भारतात प्रवास करणाऱ्या व्हिसाधारकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. भारत सरकारच्या या निर्णयानंतर सर्वाधिक चर्चेचा विषय पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा (Seema Haider) आहे. कारण या निर्णयानंतर आता तिला देखील पाकिस्तानात परत जावं लागणार का? याची चर्चा सुरु आहे.
भारत सरकारच्या या निर्णयानंतर सर्वाधिक चर्चेचा विषय पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा आहे. भारतीय नागरिक सचिन मीनाच्या प्रेमासाठी सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली होती. तिने इथे सचिनशी लग्न केले होते. अशा स्थितीत भारत सरकारच्या निर्णयानंतर सीमा हैदरलाही आपल्या चार मुलांसह पाकिस्तानात परतावे लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात पोहोचली
सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. सर्वप्रथम ती पाकिस्तानातील शारजाहून टुरिस्ट व्हिसावर नेपाळला पोहोचली. नेपाळमध्ये काही दिवस घालवल्यानंतर ती काठमांडू ते दिल्लीच्या बसमध्ये बसली आणि आपल्या चार मुलांसह भारतात पोहोचली होती. जिथे सीमा हैदरने सचिन मीनाशी लग्न केले होते. तेव्हापासून सीमा हैदर भारतात राहत आहे. यूपी एटीएसने सीमा आणि सचिनचीही पूर्ण चौकशी केली आहे.
सीमा हैदरला परत जावे लागणार का?
भारत सरकारच्या निर्णयानंतर सीमा हैदरला पाकिस्तानात परत जावे लागणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. सीमा हैदर कोणत्याही व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात पोहोचली होती आणि तिची केस अजूनही कोर्टात प्रलंबित आहे. सीमा हैदर यांनी भारतीय नागरिक सचिन मीना यांच्याशी विवाह केला आहे. अशा परिस्थितीत जर यूपी सरकारने सीमा हैदर विरोधात या प्रकरणी अहवाल दाखल केला तर तिला कोणत्याही व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात आल्याबद्दल शिक्षा होऊ शकते किंवा तिला परत पाठवले जाऊ शकते. मात्र, सीमा हैदरनेही भारतीय नागरिकत्व घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
प्रेमासाठी पाकिस्तानातून 4 मुलं घेऊन भारतात आलेली सीमा हैदर पाचव्यांदा झाली आई, 'लप्पू सा सचिन' झाला बाप























