पद्म पुरस्कारांची घोषणा; अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण
बीजमाता राहिबाई पोपेरे यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर जाहीर झाला आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर जाहीर झाला आहे. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. एकूण 118 जणांना पद्मश्री, 16 जणांना पद्मभूषण आणि 7 जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार
अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस (राजकीय) (मरणोत्तर) अनिरुद्ध जगन्नाथ (राजकीय) मेरी कॉम (खेळ) चन्नूलाल मिश्रा (कला) विश्वेशातीर्थ स्वामीजी श्री पेजावरा अधोखजा मठा उडिपी (अध्यात्म) (मरणोत्तर)
पद्मभूषण पुरस्कार एम. मुमताज अली (अध्यात्म) सय्यद मुअज्जम अली (मरणोत्तर) (बांगलादेश) मुजफ्फर हुसेन बेग अजॉय चक्रवर्ती मनोज दास बाळकृष्ण दोशी कृष्णमल जगन्नाथ एस. सी. जमीर अनिल प्रकाश जोशी डॉ. सेरिंग लँडोल आनंद महिंद्रा नीलाकांता रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर) मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) प्रा. जगदीश शेठ पी. व्ही. सिंधू वेणु श्रीनिवासनपद्मश्री पुरस्कार
राहीबाई पोपेरे (कृषी क्षेत्रातील कार्य)
जैविक बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना घर देखील नव्हतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. या घराला पावसाळ्यात गळती लागली होती.
पोपटराव पवार (जलसंधारण)
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
जगदीश लाला आहुजा (सामाजिक कार्य) मोहम्मह शरीफ जावेद अहमद टाक गुरु शशधर आचार्य डॉ. योगी अॅरॉन जयप्रकाश अग्रवाल काझी मासूम अख्तर ग्लोरिया अरियेरा झहीर खान डॉ. पद्मावथी बंडोपाध्याय डॉ. सुशोवन बॅनर्जी डॉ. दिगंबर बेहेरा डॉ. दमयंती बेश्रा हिम्मता राम भांभू संजीव बिखचंदानी गफुरभाई एम. बिलाखिया बॉब ब्लॅकमॅन इंदिरा पी पी बोरा मदनसिंह चौहान उषा चौमार सोशल लिल बहादुर छत्री ललिता आणि सरोजा चिदंबरम (जोडी) वजीरा चित्रसेना डॉ. पुरुषोत्तम दाधीच उत्सव चरणदास प्रा. इंद्र दासानायके (मरणोत्तर) एच. एम. देसाई मनोहर देवदास ओइनम बेंबेम देवी लिया डिसकिन पी. गणेश डॉ. बंगलोरे गंगाधर डॉ. रमण गंगाखेडकर श्री बॅरी गार्डिनर च्वांग मोटअप गोबा भारत गोयंका यादला गोपाळराव मित्रभानू गौंटिया तुळशी गौडा सुजॉय के. गुहा हरेकला हजाब्बा इनामुल हक मधु मंसुरी हसमुख अब्दुल जब्बार (मरणोत्तर) बिमल कुमार जैन मीनाक्षी जैन नेमनाथ जैन शांती जैन सुधीर जैन बेनीचंद्र जामटिया के. व्ही. संपत कुमार आणि विदुषी जयलक्ष्मी के.एस. (जोडी) करण जोहर डॉ. लीला जोशी सरिता जोशी सी. कमलोवा डॉ. रवी कन्नन आर. एकता कपूर याझदी नौशीरवान करंजिया नारायण जे. जोशी डॉ. नरिंदर नाथ खन्ना नवीन खन्ना एस. पी. कोठारी व्ही. के. मुनुसामी कृष्णपक्थर एम. के. कुंजोल मनमोहन महापात्रा (मरणोत्तर) उस्ताद अन्वर खान मंगनियार कट्टुंगल सुब्रमण्यम मनिलाल मुन्ना मास्टर प्रा. अभिराज राजेंद्र मिश्रा बिनपाणी मोहंती डॉ. अरुणोदय मंडल डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी सत्यनारायण मुंडयूर मनिलाल नाग एन. चंद्रशेखरन नायर डॉ. तेत्सू नाकामुरा (मरणोत्तर) शिव दत्त निर्मोही पु. लालबीयाकथांगा पचूआऊ मोझीकल पंकजाक्षी प्रशांत कुमार पट्टनाईक जोगेंद्र नाथ फुकण योगेश प्रवीण जीतू राय तरुणदीप राय एस रामकृष्णन राणी रामपाल कंगना रनौत दलावई चलापती राव शाहबुद्दीन राठोड कल्याणसिंग रावत चिंताला वेंकट रेड्डी शांती रॉय राधामोहन आणि सुश्री. साबरमती (जोडी) बटाकृष्ण साहू ट्रिनिटी साओ अदनान सामी विजय संकेश्वर कुशल कोंवर सरमा सय्यद मेहबूब शाह कादरी उर्फ सय्यदभाई मोहम्मद शरीफ श्यामसुंदर शर्मा डॉ. गुरदीपसिंग रामजी सिंह वशिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर) दया प्रकाश सिन्हा सॅन्ड्रा देसा सौझा विजयसरथी श्रीभाष्याम काली शबी महाबूब आणि श्री शेख महाबूब सुबानी (जोडी) जावेद अहमद टाक प्रदीप थलापिल येशे डोरजी थोंची रॉबर्ट थर्मन अगुस इंद्र उदयन हरीशचंद्र वर्मा सुंदरम वर्मा डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी सुरेश वाडकर प्रेम वत्सा