एक्स्प्लोर
दिल्लीत गॅस गळतीमुळे 300 पेक्षा अधिक विद्यार्थिनींची प्रकती बिघडली
नवी दिल्ली: दिल्लीतील तुघलकाबाद कंटेनर डेपोतून गॅसगळती होऊन शेजारच्या शाळेतल्या जवळपास 300 पेक्षा अधिक विद्यार्थिनींची तब्येत बिघडली आहे.
या सर्व विद्यार्थिनींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.
ज्या शाळेतील मुलींची प्रकृती बिघडली, त्या शाळेचं नाव राणी झांशी सर्वोद्य कन्या विद्यालय आहे.
सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांनी डोळ्यांची जळजळ होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर संबंधित शाळेने याबाबतची माहिती प्रशासनाला दिली.
माहिती मिळताच आपत्कालीन पथक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलांना रुग्णालयात दाखल केलं.
सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या परिसरात शिकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement