एक्स्प्लोर

Opration Sindhoor: भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली पण भारतीय वायुसेनेचं ऑपरेशन सिंदूर सुरुच; नागरिकांना महत्त्वाचं आवाहन

Opration Sindhoor: युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Opration Sindhoor: भारत आणि पाकिस्तानमधील (India vs Pakistan War) तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून (Indian Air Force) स्पष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायुसेनेने म्हटलं आहे. 

शस्त्रसंधी केल्यानंतरही पाकिस्तानकडून गोळीबार-

भारतासोबत शस्त्रसंधी केल्यानंतर अवघ्या तीन तासांत सीमेवर गोळीबार करत, पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पुन्हा एकदा सीमेलगतच्या चार राज्यांमध्ये पाकिस्तानी ड्रोन पाहायला मिळाले. मात्र त्यांचा हा हल्ला भारतीय सेनेने परतवून लावला. मुजोर पाकिस्तानला भारताकडून कडक इशारा देण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पाकच्या हालचालींवर नजर असून, सेनेला कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती दिली.

राज्यातील सिव्हिल डिफेंस यंत्रणेला अलर्ट मोडवर-

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर, तात्काळ केंद्रीय गृहमंत्रालयात बैठक बोलावण्यात आली. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह सचिवांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जवळपास सर्वच राज्यांचे मुख्य सचिव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक राज्यातील सिव्हिल डिफेंस यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसंच सीमेला लागून असलेल्या राज्यांनाही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन- डोनाल्ड ट्रम्प

हजारो वर्षांच्या काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर केलं. अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाला याचा अभिमान आहे. संघर्षात लाखो जीव गेले असते, खूप नुकसान झालं असतं, असं ट्रम्प म्हणाले. तसंच भारत-पाकनं शस्त्रसंधी केल्याने दोन्ही पंतप्रधानांची प्रशंसा केली. तुमचे धाडसी निर्णय,तुमच्या परंपरेला साजेसे असल्याचं ट्रम्प म्हणाले. तसंच दोन्ही देशांसोबत आता खूप व्यापार वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

India-Pakistan War: अमेरिकेने भारत अन् पाकिस्तानमध्ये समझोता कसा घडवून आणला? मोदी अन् शरीफ यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, 48 तासांत काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget