NEET-JEE परीक्षांच्या स्थगितीसाठी भाजप विरोधातील राज्य सरकारं एकवटणार; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
बुधवारी मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवणी केली आहे. यासाठी भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
नवी दिल्ली : नीट-जेईई परीक्षांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या राजकारण चांगलचं तापल्याचं दिसत आहे. नीट-जेईई परीक्षा स्थगित करण्यासाठी आता भाजपच्या विरोधातील राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करणार आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत पार पडलेल्या सात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अटॉर्नी जनरलला भाजप विरोधातील राज्य सरकारांशी बोलून सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
बुधवारी मोदी सरकारविरोधात विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हात मिळवणी केली आहे. यासाठी भाजप सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. या बैठकीत देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा स्थगित होणं आवश्यक आहे, याला सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला.
बैठकीत ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांना सल्ला दिला की, परीक्षा स्थगित करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांची भेट घेणं गरजेचं आहे. पुढे बोलताना ममता बॅनर्जी हेदेखील म्हणाल्या की, परीक्षा स्थगित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदींना पत्र लिहलं असून त्यावर अद्याप काहीच उत्तर आलेलं नाही. यासंदर्भात बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, 'नीट, जेईईची परीक्षा स्थगित करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन पंतप्रधानांची भेट घेणं गरजेचं आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे म्हणाले की, सुप्रीम कोर्टात जाण्याआधी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणं गरजेचं आहे.'
NEET Admit Card Download Link: नीट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड रिलिज, इथून करा डाऊनलोड
राहुल गांधी म्हणाले - विद्यार्थ्यांसमोर कोरोनासोबतच इतरही समस्या
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात घेण्यात येणाऱ्या NEET-JEE परीक्षांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार मागे हटताना दिसत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या मुद्द्यावरून सतत केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी बुधवारी ट्वीट करत म्हटलं की, NEET-JEE च्या विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि भविष्य याबाबत अनेक चिंता आहेत. त्यांच्यासमोर कोरोनासोबतच प्रवास, आसाम आणि बिहारमधील पुरस्थिती यांसारख्या समस्या आहेत. राहुल गांधी यांनी याचसोबत #AntiStudentModiGovt हॅशटॅगचा वापर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं, सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं उत्तर