पाकिस्तानचे आत्मसमर्पण! जर भारताने हल्ला थांबवला तर... पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं मोठं वक्तव्य
Operation Sindoor : भारताने पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam terror attack) बदला घेत आज पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे.

Operation Sindoor : भारताने पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam terror attack) बदला घेत आज पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. त्यामुळं भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर पाकिस्तानने आत्मसमर्पण केले आहे. जर भारताने हल्ला थांबवला तर आम्हीही कोणतीही कारवाई करणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी एका पाकिस्तानी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. जर भारताने हल्ला थांबवला तर आम्हीही काहीही करणार नाही असं ते म्हणालेत.
आम्ही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करत नाही आहोत. आम्ही फक्त आमच्या भूमीचे रक्षण करत असल्याचे ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले. गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्तानने स्पष्ट केले आहे की, ते भारतावर कोणताही हल्ला करणार नाहीत. पण जर भारताने हल्ला केला तर त्याला नक्कीच उत्तर मिळेल असेही ते म्हणाले.
चीन पाकिस्तानसोबत उभा
पाकिस्तान आणि भारत यांच्यातील परिस्थितीबाबत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, चीन भारताच्या लष्करी कारवाईला "खेदजनक" मानतो. चीनने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तान हे दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. चीनचेही शेजारी आहेत. चीन सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतो, परंतु सर्व पक्षांना शांतता आणि स्थैर्य राखण्याचे आवाहन करतो. चीनने भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्यास, परिस्थिती आणखी बिघडू शकेल अशी कोणतीही पावले उचलू नयेत आणि शांततेने हा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले आहे.
भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे केले उद्ध्वस्त
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बुधवारी रात्री 1 वाजता पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 ठिकाणी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारतीय सैन्याच्या या कारवाईत पाकिस्तानातील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आणि अनेक दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड मसूद अझहाच्या कुटुंबातील 14 सदस्यांचाही समावेश आहे. पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू पाकच्या दहशतवाद्यांनी हिरावलं, त्या सर्व महिलांचा बदला आज भारतीय सैन्यानं घेतला. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. भारतानं याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar on Operation Sindoor : पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक, पण, एका गोष्टीची चिंता, ऑपरेशन सिंदूरनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य























