एक्स्प्लोर

Sharad Pawar on Operation Sindoor : पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक, पण, एका गोष्टीची चिंता, ऑपरेशन सिंदूरनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य  

भारताने पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam terror attack) बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर' ( Operation Sindoor ) अंतर्गत एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Sharad Pawar Operation Sindoor And PM Modi : भारताने पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam terror attack) बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानवर 'ऑपरेशन सिंदूर' ( Operation Sindoor ) अंतर्गत एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळं देशभर भारतीय सैन्य दलाचं कौतुक होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. पण चीनने भारताला संरक्षण न दिल्यानं पवार यांनी चिंता व्यक्त केली. देशाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी सज्ज राहण्याची गरज असून, या स्थितीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारला पाठिंबा देण्याचं आवाहन देखील शरद पवार यांनी केलं आहे. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकेनं, जपानने तसेच काही महत्वाच्या देशांनी भारताला संरक्षण दिलं आहे. पण काळजी करण्याची गोष्ट म्हणजे चीनने दिलेलं नाही. आपल्याला आपल्या देशाचं महत्व, आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व जतनं करावं लागेल. त्यासाठी जे काही कष्ट, त्याग करण्याची माणसिकता देशवासियांमध्ये दिसते ही जमेची बाजू आहे असे शरद पवार म्हणाले.

पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प 

भारताने पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी 'Operation Sindoor'द्वारे एअर स्ट्राइक केले आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संबंध देशात आणि लोकांमध्ये अस्वस्थता होती. पलीकडने लोक येतात आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना गोळ्या घालतात. यामध्ये कोणत्याही सरकारला लगेच भूमिका घेणं शक्य नाही. हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. भारत आणि पाकिस्तानच्या नकाशा निर्देश करुन ठेवा. त्याच्यामध्ये POK काश्मीरचा भाग पाकिस्तानने घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे. पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते. हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतल्याचे शरद पवार म्हणाले. पीओकेमध्ये हल्ले झाले यात एक बदल दिसतो की जे काश्मीर मध्ये झाले. घटना घडल्यानंतर संपूर्ण काश्मीर मध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली. काश्मीरमधील विधानसभेत एकमताने निषेधाचा ठराव झाला, त्यामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका दहशतवाद विरोधात केली. 26 ते 27 लोकांचा मृत्यू झाला त्याचा हिशोब करायचा होता. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये अशी खबरदारी घेतल्याचे शरद पवार म्हणाले. 

आपल्याला सावध रहावं लागेल

दरम्यान, भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर अमेरिका जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला संरक्षण दिले आहे. पण काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने ते दिलेलं नाही. ठिक आहे. शेवटी आपल्याला आपल्या देशाचे महत्त्व, अधिकार आणि सार्वभौमत्त्व जतन करावं लागेल. यासाठी कष्ट देशवासीय म्हणून करावे लागतील ती मानसिकता सर्वांची दिसते ही जमेची बाजू आहे. हा जो सगळा भाग आहे त्या सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तानला त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे. त्यामुळे यावेळी आपल्याला सावध रहावं लागेल. आपल्या फोर्सेस आणि पंतप्रधानांनी जे काही निर्णय घेतले ते योग्यच घेतले. काही निष्पाप भगिनींचे कुंकू पुसले गेले होते त्यामुळे जर हे नाव दिले असेल तर योग्य असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

9 दहशतवादी तळांवर हल्ला

पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 26 पर्यटकांच्या मृत्यूचा बदला भारतानं पाकिस्तानच्या घरात घुसून घेतला. पाकिस्ताननं (Pakistan) आसरा दिलेल्या तब्बल 9 दहशतवादी तळांच्या भारतानं चिंध्या उडवल्या. भारतानं याला 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिलंय. पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू पाकच्या दहशतवाद्यांनी हिरावलं, त्या सर्व महिलांचा बदला आज भारतीय सैन्यानं घेतला. संपूर्ण देशभरात भारतीय सैन्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

'पिक्चर अभी बाकी है', ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला इशारा, माजी लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election Opinion Poll: पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब
ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब
Shocking incident: धक्कादायक... पतीनं भांडणावेळी कापलं पत्नीचे नाक, बोटांवरही ब्लेडने केला हल्ला, नाकाचा भाग प्राण्यांनी खाल्ला, नेमकं काय घडलं?
धक्कादायक... पतीनं भांडणावेळी कापलं पत्नीचे नाक, बोटांवरही ब्लेडने केला हल्ला, नाकाचा भाग प्राण्यांनी खाल्ला, नेमकं काय घडलं?
Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Beed : 'सरकार मतचोरीचं, निवडून दिलेलं नाही', ठाकरेंचा हल्लाबोल
Maharashtra Politics: पहिलं कर्जमुक्ती, मगच मत; ठाकरेंचा शेतकऱ्यांना कानमंत्र
Farmers' Distress: 'CM पंचांग काढून बसलेत, त्यांच्या खुर्चीवर वक्र दृष्टी', Uddhav Thackeray यांची टीका
Beed Farmer : 'एवढं लबाड मुख्यमंत्री कसा काय मिळाला?', अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याचा संतप्त सवाल
Uddhav On Tour: 'तुम्ही सत्तेत आल्यास मराठवाड्याला पाणी द्या', Beed दौऱ्यात शेतकऱ्याची Uddhav Thackeray यांच्याकडे भावनिक मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election Opinion Poll: पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
पंतप्रधान मोदींचे हनुमान चिराग पासवान यांना मोठा झटका; ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज, बिहार निवडणुकीत वारं फिरणार?
ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब
ऑपरेशन सरकार चोरी! ब्राझीलच्या माॅडेलकडून हरियाणात 22 वेळा मतदान, 25 लाखांची मतचोरी, काँग्रेस फक्त 22 हजारांनी पराभूत; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा बाॅम्ब
Shocking incident: धक्कादायक... पतीनं भांडणावेळी कापलं पत्नीचे नाक, बोटांवरही ब्लेडने केला हल्ला, नाकाचा भाग प्राण्यांनी खाल्ला, नेमकं काय घडलं?
धक्कादायक... पतीनं भांडणावेळी कापलं पत्नीचे नाक, बोटांवरही ब्लेडने केला हल्ला, नाकाचा भाग प्राण्यांनी खाल्ला, नेमकं काय घडलं?
Mirzapur Train Accident: कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
कार्तिक स्नानासाठी गंगा घाटावर चालल्या, ट्रॅक ओलांडताना रेल्वे आली; सहा महिलांच्या जागेवर चिंधड्या, 50 मीटर लांब मृतदेहांचे तुकडे विखुरले
Pune Crime: कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदूबाबाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब,  वेदिका पंढरपूरकर फरार
कोथरुडच्या महात्मा सोसायटीतील भोंदू मांत्रिकाचा बंगला ओस पडला, सगळे कर्मचारीही गायब, वेदिका पंढरपूरकर फरार
Solapur Politics: नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं, सोलापूरात गोरे Vs मोहिते पाटील यांच्यात कडवी लढत, पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Bollywood Actor Extramarital Affair: दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
Embed widget