एक्स्प्लोर
Maharashtra Politics: पहिलं कर्जमुक्ती, मगच मत; ठाकरेंचा शेतकऱ्यांना कानमंत्र
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पीक नुकसानीच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. 'सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनेच मारलं पाहिजे,' असे म्हणत ठाकरेंनी शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमुक्तीची मागणी करण्यास सांगितले आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'सात बारा कोरा करू' या जुन्या घोषणेची आठवण करून देत सरकारला जाब विचारला. मराठवाडा आणि विदर्भात कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. 'लाडकी बहीण' योजनेत घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. माझा शेतकरी गुन्हेगार नाही, तो अन्नदाता आहे, त्यामुळे त्याला कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती हवी, असे ठाकरे म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















