Bollywood Actor Extramarital Affair: दोन मुलांचा बाप, 20 वर्षांचा सुखी संसार; तरीसुद्धा बॉलिवूड दिग्गजाचे तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीसमोरच भांडाफोड
Bollywood Actor Extramarital Affair: अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं अभिनेत्याचा माग काढला आणि समोर अनेक खळबळजनक गोष्टी आल्या.

Bollywood Actor Extramarital Affair: प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं (Tanya Puri) त्यांच्या एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी एका प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल (Extramarital Affair) उघडपणे सांगितलंय. त्यामुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. तान्या पुरी यांनी खुलासा केलाय की, अभिनेत्याच्या पत्नीच्या मॅनेजरनं त्यांना संपर्क साधला होता. तसेच, अभिनेता असलेल्या पतीच्या सगळ्या करामतींबाबत माहिती काढायला सांगितली होती. अभिनेत्याच्या पत्नीनं सांगितल्याप्रमाणे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरीनं अभिनेत्याचा माग काढला आणि समोर अनेक खळबळजनक गोष्टी आल्या. तान्या पुरीला चौकशीवेळी आढळलं की, दिग्गज अभिनेता त्याच्या 20 वर्षांच्या संसारात आपल्या पत्नीचा प्रत्येक पावलावर विश्वासघात करत होता. अभिनेत्याचे अनेक तरुण अभिनेत्रींशी संबंध होते.
एका धक्कादायक खुलाश्यात, खाजगी गुप्तहेर तान्या पुरीनं दावा केलाय की, एक बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) त्याच्या पत्नीला खुलेआम फसवतोय. अलिकडेच सिद्धार्थ कन्ननशी बोलताना तान्या पुरी यांनी खुलासा केला की, ज्यावेळी दिग्गज अभिनेत्याची चौकशी केली, त्यावेळी धक्कादायक वास्तव समोर आलं. अभिनेता त्याच्या पत्नीला फसवतोय आणि त्याचे अनेक तरुण अभिनेत्रींसोबत अफेअर्स आहेत.
तान्या पुरीनं दावा केला की, अभिनेत्यानं 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला त्याच्या पत्नीशी लग्न केलं होतं. कॅमेऱ्यासमोर हे जोडपं परफेक्ट कपल दिसलं, पण वास्तविक जीवनात अजिबातच तसं नाही. तान्यानं सांगितलं की, "मला वाटतं की, बॉलिवूडमध्ये विवाहबाह्य संबंध खूप आहेत, पण त्याबद्दल कुणीच बोलत नाहीत. त्यांना स्वतःची एक परफेक्ट इमेज सर्वांना दाखवायची आहे. मी अशा जोडप्याबद्दल बोलतेय, जे फार वयस्कर नाहीत, ज्यांनी 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला लग्न केलेलं..."
तान्या पुरीनं सांगितलं की, "मी ज्या जोडप्याबाबत बोलतेय, त्यांच्या नात्यात बॉलिवूड सुपरस्टार असलेला पती खुलेआम पत्नीला धोका देत होता आणि त्याचे इंडस्ट्रीतल्या तरुण अभिनेत्रींसोबत संबंध आहेत. त्यानं 2-3 फिल्म्स केल्यात, ज्यामध्ये अभिनेता कित्येक प्रकरणात तरुण अभिनेत्रींसोबत दिसून आला. त्याच्या पत्नीलाही त्याबाबत माहीत आहे. एवढंच काय, त्याच्या मुलांनाही त्याबाबत माहीत आहे. त्याची दोन्ही मुलं इंडस्ट्रीत आहेत. मुलांनाही व्यवस्थितरित्या माहीत आहे की, त्यांचे वडील नेमकं करतायत काय? पण, कॅमेऱ्यासमोर मात्र अभिनेता आणि त्याची पत्नी परफेक्ट कपलप्रमाणे दिसतात.
"अभिनेत्याची पत्नी वेल एज्युकेटेड आहे... तर तिचा नवरा एक 'देसी मुंडा' आहे. अभिनेता कॅमेऱ्यासमोर अगदी सोज्वळ असल्याचा आव आणतो. पण, पडद्याच्या मागे, त्यानं कित्येक तरुण अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध ठेवलेत..." इन्वेस्टिगेशनचा खुलासा झाल्यानंतर अभिनेत्यानं पत्नीची माफी मागितली. अभिनेत्यानं वचन दिलं की, तो त्याची पत्नी सोडून इतर कुणाशी शारीरिक संबंध ठेवणार नाही... तान्यानं हा देखील दावा केला की, अभिनेत्याच्या पत्नीनंही पतीची चूक पोटात घालून त्याच्या चुकांवर पांघरूण घातलं आणि पुन्हा त्याच्यासोबत संसार करू लागली."
तान्यानं अभिनेत्याचं नाव घेणं टाळलं
तान्या पुरीनं म्हटलं की, "या जोडप्यासाठी भलत्याच कुणासोबत तरी शारीरिक संबंध ठेवणं म्हणजे, धोका नव्हता... ती त्याला सतत माफ करत राहिली. अखेर मुलांना कळाल्यानंतर मात्र, तिची सहनशक्ती संपली. हे तिच्यासाठी खूपच लाजीरवाणं होतं. तिच्यासाठी कदाचित इमोशनल धोका, शारीरिक धोक्यापेक्षा मोठा होता..." दरम्यान, तान्यानं कोणाचंही नाव घेणं आवर्जुन टाळलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























