एक्स्प्लोर
Farmers' Distress: 'CM पंचांग काढून बसलेत, त्यांच्या खुर्चीवर वक्र दृष्टी', Uddhav Thackeray यांची टीका
मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर सडकून टीका केली आहे. 'आता आपले जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते पंचांग काढून बसलेले आहेत,' अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आणि त्यांच्या खुर्चीवर अनेक ग्रहांची वक्र दृष्टी असल्याचे म्हटले. सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती पुढच्या वर्षी जूनमध्ये मिळणार असेल, तर शेतकऱ्यांनी खरीप कर्जाचे हप्ते कसे भरायचे आणि त्यांना रब्बीसाठी कर्ज कसे मिळणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आपल्या काळात कोणताही अभ्यास न करता आपण दोन लाखांपर्यंत पीक कर्ज माफ केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. 'लाडकी बहीण' योजनेमुळे घरातल्या दोनच महिलांना लाभ देऊन सरकार घराघरात भांडणे लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















