एक्स्प्लोर

8 October In History : भारतीय वायु सेना दिवस,  8 ऑक्टोबर आहे 'या' घटनांचा साक्षीदार 

On This Day In History : भारतीय वायु सेनेची स्थापनवा 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून केली. (Air Force Day )

मुंबई :  8 ऑक्टोबर हा दिवस इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे.  आजच्याच दिवशी भारतीय वायु सेनेची ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून स्थापना केली.  भारतीय वायु सेना दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारतीय हवाई दलाच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही.  अमेरिका, रशिया आणि चीन पाठोपाठ भारताचे हवाई दल जगात सर्वात मोठे आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून केली होती.  स्वातंत्र्यानंतर त्याची ओळख भारतीय भारतीय वायुसेना म्हणून झाली.  1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिवस’ (Air Force Day )म्हणून साजरा होतो.  आजच्या दिवशी म्हणजेच  8 ऑक्टोबर 2005 रोजी उत्तर पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतासह भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंप झाला होता. यात जवळपास 87 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.  

2014 : थॉमस एरिक डंकन - इबोलाचे निदान झालेल्या अमेरिकेमधील पहिल्या व्यक्तीचे निधन झाले.
अमेरिकेतील पहिला इबोला रुग्ण म्हणून ओळखले जाणारे थॉमस एरिक यांचा मृत्यू झाला.  थॉमस डंकनचा 8 ऑक्टोबर 2014 रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. डंकन 20 सप्टेंबर 2014 रोजी लायबेरियाहून टेक्सासला येत असताना इबोला विषाणूची लागण झाली.  त्यानंतर त्याला उपचारासाठी अमेरिकेतील डॅलस रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. 

2005 : काश्मीर भूकंप 
 8 ऑक्टोबर 2005 रोजी उत्तर पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वा प्रांतासह भारताच्या जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंप झाला होता.  भारतीय वेळेनुसार सकाळी  नऊ वाजून 20 मिनिटांनी हा भूकंप झाला होता.  त्याचा केंद्रबिंदू पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद जवळ होता. भारत आणि पाकिस्तानच्या इतर भागांव्यतिरिक्त अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांतातही त्याचे धक्के जाणवले. 1935 च्या क्वेटा भूकंपापेक्षा दक्षिण आशियातील हा सर्वात प्राणघातक भूकंप मानला जातो.  या भूकंपात तब्बल  87 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.  

1978  : केन वॉर्बी  यांनी पाण्यावरील 275.97 नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम केला
केन वार्बी हे ऑस्ट्रेलियन मोटरबोट रेसर आहे. त्याने 8 ऑक्टोबर 1978 रोजी बेलोज डॅम येथे सेट केलेल्या पाण्याच्या वेगाचा विक्रम केला. 20 नोव्हेंबर 1977 रोजी त्याने 288.60 mph (464.46 km/h) पाण्याच्या वेगाचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि ली टेलरचा विक्रम 3 mph (4.8 km/h) पेक्षा थोडा अधिक वेगाने मोडला. त्यानंतर 8 ऑक्टोबर 1978 रोजी 317.6 mph (511.1 km/h) सह  त्याने एक विक्रम प्रस्थापित केला जो आद्याप कोणी मोडलेला नाही. 

1947 : फ्रँकलिन नॅशनल बँक - अमेरिकेतील बँक फसवणूक आणि गैरव्यवस्थापनामुळे कोसळली

 न्यूयॉर्क येथील फ्रँकलिन स्क्वेअरमध्ये स्थित एकेकाळी युनायटेड स्टेट्सची 20 वी सर्वात मोठी बँक होती.  अमेरिकेतील बँक फसवणूक आणि गैरव्यवस्थापनामुळे 8 ऑक्टोबर 1974 रोजी कोसळली.  
 
1970 : अलेक्झांडर सोलझेनित्सिन यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
अलेक्झांडर इसाविच सोल्शनित्सिन यांचा जन्म 11 डिसेंबर 1918 रोजी झाला.  सोल्शनित्सिन हे 20 व्या शतकातील रशियन भाषेतील महत्त्वाचे लेखक होते. सोल्शनित्सिनने अनेक कादंबऱ्या, कविता आणि लघुकथा लिहिल्या. त्यांना 1970 चे साहित्यातील  नोबेल पारितोषिक मिळाले. 
 
1959 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा डी-लिट पदवीने सन्मान 
8 ऑक्टोबर 1959 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर  यांना पुणे विद्यापीठाची सन्माननीय डी लिट पदवी देऊन गौरवण्यात आले. 

 1932 : भारतीय वायु सेना दिवस 
भारतीय वायू सेना दल  हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. भारतीय हवाई दलाच्या ताकदीमुळे आज कोणताही देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करत नाही.  अमेरिका, रशिया आणि चीनक पाठोपाठ भारताचे हवाई दल जगात सर्वात मोठे आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे. याच हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी ब्रिटिशांनी रॉयल भारतीय हवाईदल म्हणून केली होती.  स्वातंत्र्यानंतर त्याची ओळख भारतीय हवाईदल म्हणून झाली.  1932 पासून दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस ‘भारतीय वायु सेना दिवस म्हणून साजरा होतो.    

1856 : दुसरे अफू युद्ध : पाश्चात्य शक्ती आणि चीन यांच्यातील बाणाच्या घटनेने सुरू झाले.

1813 : रीडचा करार  :  बव्हेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्यात रीडचा करार झाला.
 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke :  NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
NTA ने 47 अधिकाऱ्याना बडतर्फ केलं, अभिजीत दिपकेंनी एक फोटो पोस्ट केला अन् मोठा मेसेज दिला
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले
काँग्रेसविरुद्ध भाजप रस्त्यावर, राहुल गांधींविरुद्ध घोषणाबाजी; कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची, बॅरिकेड्सही ढकलले

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Embed widget