(Source: ECI/ABP News/ABP Majha)
23 October In History: जगातील पहिला आयपॉड लॉन्च, फुटबॉलचा जादूगार पेलेचा जन्मदिवस
On This Day In History : आजच्याच दिवशी स्टीव्ह जॉब्सन 1976 मध्ये स्थापन केलेल्या अॅपल कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे उतपादन बाजारात आणले. कॉम्प्युटर, मोबाईल, आयपॉड यासह अनेक उत्पादने बनवणाऱ्या अॅपलची उत्पादने गुणवत्तेत सर्वोत्तम मानली जातात. अॅपलने 23 ऑक्टोबर 2001 मध्ये iPod बाजारात आणला.
मुंबई : आजच्याच दिवशी स्टीव्ह जॉब्सन 1976 मध्ये स्थापन केलेल्या अॅपल कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवणारे उतपादन बाजारात आणले. कॉम्प्युटर, मोबाईल, आयपॉड यासह अनेक उत्पादने बनवणाऱ्या अॅपलची उत्पादने गुणवत्तेत सर्वोत्तम मानली जातात. अॅपलने 23 ऑक्टोबर 2001 मध्ये iPod बाजारात आणला. छोट्या आयपॉडने हजारो गाणी श्रोत्यांच्या खिशात अगदी आरामात बसवली. त्यावेळी हे जगातील सर्वात यशस्वी आणि क्रांतिकारक उत्पादन मानले गेले. आजच्याच दिवशी फुटबॉलचा जादूगार म्हटल्या जाणाऱ्या पेलेचा जन्म झाला होता. म्हणायचे तर पेलेचे नाव जगातील प्रत्येक मुलाला माहीत आहे, पण त्याचे पूर्ण नाव Edson Arantes do Nascimento आहे. हे फार कमी लोकांना माहीत आहे. ब्राझीलचा हा सर्वोत्तम खेळाडू आपल्या देशासाठी तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता. पेलेला बीबीसीचा लाईफ टाइम पुरस्कारही मिळाला आहे. 1999 मध्ये पेलेला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने "शतकातील फुटबॉल खेळाडू" म्हणून घोषित केले.
1937 : प्रसिद्ध अभिनेता देवेन वर्मा यांचा जन्मदिवस
आज प्रसिद्ध कॉमेडियन देवेन वर्मा यांची जयंती आहे. देवेन वर्मा यांनी 42 वर्षे बॉलीवूडमध्ये काम केले आणि नंतर स्वतःला अभिनयापासून दूर केले. देवेन वर्मा यांनी 'दीवार', 'अनुपम', 'चोर के घर चोर', 'बेशरम', 'भोला भला', 'लोक-परलोक' आणि 'गोलमाल' यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलं होत. 70 च्या दशकात देवेन वर्मा हे बॉलिवूडमधील एकमेव कॉमेडियन होते, ज्यांना खूप मागणी होती. देवेन वर्मा यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चोरी मेरा काम' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारही मिळाला होता. देवेन वर्मा यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत जवळपास 149 चित्रपटांमध्ये काम केले. देवेन वर्मा यांनी 2 डिसेंबर 2014 रोजी हृदयविकाराचा झटका आणि किडनी निकामी झाल्याने जगाचा कायमचा निरोप घेतला.
1943 : बोस यांच्या झाशीची राणी रेजिमेंटने सिंगापूरमध्ये प्रशिक्षण सुरु केले
झाशीची राणी रेजिमेंट ही आझाद हिंद फौजेची एक महिला रेजिमेंट होती. लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली निटची स्थापना जुलै 1943 मध्ये दक्षिण-पूर्व आशियातील स्वयंसेवी भारतीय महिलांनी केली. या रेजिमेंटचे नाव झाशी राज्याच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावावर ठेवण्यात आले. रेजिमेंटच्या स्थापनेची घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी 12 जुलै 1943 रोजी केली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद फौजेच्या झाशीची राणी रेजिमेंटने 23 ऑक्टोबर 1943 मध्ये सिंगापूरम येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
1945 : शफी इनामदार यांचा जन्मदिवस
शफी इनामदार यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1945 रोजी दापोलीत झाला. शफी इनामदार यांनी 1982 साली 'विजेता' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1983 मध्ये आलेल्या अर्ध सत्य या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी इन्स्पेक्टर हैदर अलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पहिले नाही. चित्रपटांमध्ये प्रतिभा दाखवण्यासोबतच शफी इनामदार यांचा टेलिव्हिजनवर ही दबदबा होता. 'ये जो है जिंदगी' या लोकप्रिय मालिकेत त्यांनी दमदार भूमिका साकारली होती. याशिवाय ते गुलजार यांच्या गालिब या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसले होते. 13 मार्च 1996 रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना पाहत असताना शफी इनामदार यांना हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना -
1907: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
1850: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
1944: दुसरे महायुद्ध सोविएत रेड सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
1973: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
1997: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्राप्त.