काळजी घ्या, पश्चिम बंगालमध्ये सात वर्षाच्या मुलाला ओमायक्रॉनची बाधा
Omicron in India : देशात ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावत असून बाधितांची संख्या वाढत आहे.
![काळजी घ्या, पश्चिम बंगालमध्ये सात वर्षाच्या मुलाला ओमायक्रॉनची बाधा omicron in India seven years old boy found omicron infected काळजी घ्या, पश्चिम बंगालमध्ये सात वर्षाच्या मुलाला ओमायक्रॉनची बाधा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/2fd69395c1e09de5ade1dfd7b44fc41a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron in India : देशातील कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये आता झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी पश्चिम बंगालमध्येही एक प्रकरण समोर आले आहे. तामिळनाडूमध्ये सात वर्षाच्या मुलाला ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या 73 वर गेली आहे.
सात वर्षाच्या मुलाला ओमायक्रॉनची लागण
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एका सात वर्षाच्या मुलाला ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. हा बाधित नातेवाईकांसह अबूधाबी येथून हैद्राबाद मार्गे पश्चिम बंगालमध्ये आला होता. तर, तेलंगणामध्ये दोन परदेशी नागरिकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
ओमायक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात 32 बाधितांची नोंद करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हारोलॉजीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात नोंदवण्यात आलेल्या चार प्रकरणांपैकी दोन उस्मानाबाद आणि प्रत्येकी एक-एक बुलढाण्यातील व मुंबईतील आहे. चार बाधितांपैकी तिघांचे लसीकरण झाले आहे. या सर्व बाधितांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 7,974 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 343 कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. ज्यामध्ये केरळात काल (बुधवारी) कोरोनाचे 4006 आणि 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 7,948 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 75 हजार 868 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आणि 864 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
युरोपसाठी जानेवारी महिना धोक्याचा
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील 77 देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन फैलावला आहे. युरोपीयन महासंघाने चिंता व्यक्त करताना म्हटले की, जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत युरोपमध्ये ओमायक्रॉनची लाट येण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वांच्या बातम्या:
- वेल डन मुंबई! कोरोना प्रादुर्भावापासून तिसऱ्यांदा मुंबईत कोरोनामुळं 'शून्य' मृत्यू
- Mumbai Omicron : मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)