एक्स्प्लोर

'कॅग' अहवालाला दुर्लक्षित करण्यासाठी कोणाला जबाबदार धरायचे?', प्रियांका गांधींचा मोदी सरकारला सवाल

Priyanka Gandhi on Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातावर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत.

Priyanka Gandhi on Odisha Train Accident: ओडिशामधील (Odisha) बालासोरमध्ये शुक्रवारी 2 जून रोजी भीषण रेल्वे अपघात (Railway Accident) झाला. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला तर 900 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर आहे की भारतीय रेल्वेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. घटनास्थळी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पाहणी केली. तसेच अपघातग्रस्त लोकांना मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. पंरतु काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रेल्वेमंत्र्यांवर आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत. प्रियांका गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'ओडिशामधील अपघाताला आता 24 तासांपेक्षा अधिक काळ झाला आहे. नैतिक आधारांवर उच्चपदांवर बसलेल्या लोकांना त्यांच्या जबाबदारीचा जाणीव आता करुन द्यायला हवी का?'

'तज्ज्ञ, संसदीय समिती, कॅग अहवालाकडे दुर्लक्ष करण्यासाठी कोणाला जबाबदार ठरवायचे?' असा सवाल देखील प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये विचारला आहे.  'रेल्वेमधील रिकाम्या जागा आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये निधीची जी कमतरता भासत आहे यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? लाल बहादूर शास्त्री,नितीश कुमार, माधवराव सिंधिया यांनी देखील नैतिकतेचे पालन करुन रेल्वेमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यायला नको का?' असा सवाल करत प्रियांका गांधींनी रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.  

रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

'ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी करण्यसाठी समिती गठित करण्यात आली असून लवकरच अहवाल सादर करण्यात येईल', असा दावा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार देखील करण्यात येत आहेत. रेल्वेरुळ पूर्ववत करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.यादरम्यान विरोधी पक्षांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. 

अपघातावर रेल्वेमंत्र्यांची प्रतिक्रिया

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या घटनेला 39 तास पूर्ण झाल्यानंतर सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'रेल्वेचे सुरक्षा आयुक्त यासंदर्भात योग्य ती चौकशी करत आहेत. त्यामुळे माझ्याकडून यासंदर्भात कोणतीही टीप्पणी करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अहवाल आल्यावर या अपघाताचे मूळ कारण समजेल.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Odisha Train Accident : ''कवचमुळे रेल्वे अपघात टाळता येईल'', रेल्वेमंत्र्यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, विरोधक आक्रमक; नक्की काय आहे ही यंत्रणा?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवारJay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget