Corbevax Booster Dose : देशात प्रथमच बूस्टर डोससाठी 'मिक्स' कोरोना लसीची शिफारस; केंद्र सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा
Corbevax Booster Dose : कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यासाठी कॉर्बेवॅक्सचा वापर केला जात आहे.
Corbevax Booster Dose : ज्यांना Covishield किंवा Covaxin चे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशा लोकांना तिसरा डोस (Booster Dose) म्हणून NTAGI बायोलॉजिकल ईद्वारे विकसित कॉर्बेव्हॅक्स लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. Corbevax ही भारतातील पहिली स्वदेशी विकसित रिसेप्टर बायडिंग डोमेन (RBD) प्रोटीन सब-युनिट लस आहे. जी कोरोनावर अत्यंत प्रभावी असल्याचंही सांगितलं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणावरील नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपनं ही शिफारस केली आहे.
NTAGI नुसार, ज्या प्रौढांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड किंवा भारत बायोटेकची कोवॅक्सीन लस मिळाली आहे, त्यांना बूस्टर डोस घेताना कॉर्बेवॅक्स लस दिली जाऊ शकते. सध्या, कोविड-19 लस जी पहिला आणि दुसरा डोस म्हणून घेण्यात आली होती, त्याच लसीचा तिसरा डोस दिला जात आहे. सरकारनं मान्यता दिल्यास, पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणासाठी वापरल्या जाणार्या कोविड लसीऐवजी बूस्टर डोस देताना देशात प्रथमच परवानगी दिली जाईल.
शिफारशीत काय म्हटलंय?
20 जुलै रोजी झालेल्या बैठकीत कोविड-19 कार्यगटानं तिसऱ्या टप्प्यातील आकड्यांचा आढावा घेतला. यामध्ये 18 ते 80 वर्ष वयोगटातील कोविड-19 निगेटिव्ह व्यक्ती ज्यांनी Covishield किंवा Covaccine चे पहिले दोन डोस घेतले होते, Corbevax लस तिसरा डोस म्हणून दिल्यानंतर त्यांच्या प्रतिकारशक्तीवर होणाऱ्या परिणामांचं मूल्यांकन करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेटा तपासल्यानंतर, CWG ला आढळून आलं की, ज्यांना Covaxin किंवा Covishield पहिल्या आणि दुसरा डोस म्हणून देण्यात आलं आहे. त्यांना तिसरा डोस म्हणून Corbevax दिला जाऊ शकतो, ज्यामुळे अँटिबॉडीजची महत्त्वपूर्ण पातळी (व्हायरसशी लढण्यासाठी) तयार होते.
क्या कहा गया सिफारिश में?
सध्या लहान मुलांना दिली जातेय Corbevax
भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब्यूनिट लस Corbevax, सध्या COVID-19 लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जात आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 4 जून रोजी 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून Corbevax ला मंजूरी दिली.
10 जानेवारीपासून दिला जातोय बूस्टर डोस
सध्या, पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वापरण्यात आलेली कोविड-19 लस 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांना खबरदारी म्हणून दिली जात आहे. 18-59 वयोगटातील 4.13 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत, तर 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांना, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना 5.11 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतानं 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना लसींचा बूस्टर डोस (Booster Dose) देणं सुरू केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :