एक्स्प्लोर
पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून एनएसजी कमांडोची आत्महत्या
एका एनएसजी कमांडोनं आपल्या पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे.
गुरुग्राम : दिल्लीजवळील गुरुग्रामध्ये आज (मंगळवार) सकाळी एका एनएसजी कमांडोनं आपल्या पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मानेसर येथील एनएसजी कॅम्पमध्येच घडली.
आज सकाळी एनएसजी कॅम्पमधील एका कमांडोचा आपल्या पत्नी आणि मेहुणीशी बराच वाद झाला. याचवेळी त्यानं आपल्या पत्नीवर आणि मेव्हणीवर गोळ्या झाडल्या. यानंतर त्यानंही आत्महत्या केली. या दोन्ही महिलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून दोन्ही महिलांच्या जबानीनंतर नेमकं काय घडलं हे समोर येईल. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मानेसर धरमवीर यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement