एक्स्प्लोर
गेलं ओखी कुणीकडे? चक्रीवादळाचा नामोनिशाण नाही!
गुजरातच्या दिशेनं सरकलेल्या ओखी वादळाने मुंबईला जरी कुठलाही धोका पोहचवला नसला, तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मोठं नुकसान केलं आहे
मुंबई : केरळ आणि तामिळनाडूमध्ये तब्बल 13 जणांचा जीव घेऊन आणि महाराष्ट्रातल्या मच्छिमार आणि शेतकऱ्यांचं नुकसान करणारं ओखी वादळ जणू गायब झालं आहे. कारण अरबी समुद्रात उठलेल्या या वादळाचं आता नामोनिशानही दिसत नाही. भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या सॅटेलाईट चित्रामध्ये हे वादळ आता विरुन गेल्याचं दिसत आहे.
गुजरातच्या दिशेनं सरकलेल्या ओखी वादळाने मुंबईला जरी कुठलाही धोका पोहचवला नसला, तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीचं मोठं नुकसान केलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होऊन बागायतदारांना मोठा फटका बसला.
आंब्याचा मोहोर गळल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तिकडे नाशिक आणि मनमाडमध्ये कापूस आणि कांद्याच्या पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांनी शेतातला काढून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजला.
हीच परिस्थिती कापसाची असून आधीच बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात असताना हाती येणारा कापूस पावसानं भिजल्यामुळे काळा पडणार आहे. गेले दोन दिवस अचानक आलेल्या पावसामुळे डहाणू, वाणगांव, चिंचणी या भागातली हजारो हेक्टरवरची मिरचीची रोपटं जमीनदोस्त झाली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement