PM Modi: अविश्वास प्रस्ताव आणायची तयारी करा... 2018 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती 2023 सालची भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
No Confidence Motion: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2018 सालचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी 2023 सालच्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी केली होती.
नवी दिल्ली: विरोधकांनी संसदेत आता नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) आणला आहे, पण याचं भाकीत पंतप्रधान मोदींनी 2018 सालीच केलं होतं. 2018 सालच्या अविश्वास प्रस्तावावर उत्तर देताना मोदी म्हणाले होते की, मी आपल्याला शुभकामना देतो, 2023 साली असाच अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी आता सुरू करा. नरेंद्र मोदी यांचा त्यावेळचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 2018 साली विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावेळी उत्तर देताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांची खिल्ली उडवत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, "मी तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो की तुम्ही इतकी चांगली तयारी केली की तुम्हाला 2023 मध्ये पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळेल."
Opposition is bringing a No confidence motion against government which PM Modi had predicted 5 years ago! pic.twitter.com/PBCaUe3fqG
— DD News (@DDNewslive) July 26, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा त्यावेळचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यामध्ये नरेंद्र मोदी म्हणाले होते की, हा काँग्रेसच्या अहंकाराचा परिणाम आहे, एकेकाळी काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही 400 च्या वर होती, आता ती 40 पर्यंत आली आहे. भाजपने केलेल्या कामामुळे, देशसेवेमुळे दोन खासदारांवरून ही संख्या आता 300 च्या वरती गेली आहे.
सन 2018 मध्ये ज्यावेळी टीडीपीनं अविश्वास प्रस्ताव आणला होता, त्याच चर्चेतल्या भाषणानंतर काँग्रेसच्या राहुल गांधींनी मोदींना मिठी मारलेली होती. आता पुन्हा मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. त्यामउळे बऱ्याच कालावधीनंतर लोकसभेत यानिमित्तानं मोठी डिबेट रंगणार यात शंका नाही.
No Confidence Motion : कसा सादर होतो अविश्वास प्रस्ताव?
- अविश्वास प्रस्तावासाठी किमान 50 खासदारांच्या सह्यांचं अनुमोदन असेल तर कुणीही सदस्य अशी नोटीस दाखल करु शकतो.
- सकाळी दहा वाजण्याच्या आधी अशी नोटीस दाखल झाली तर त्याच दिवशी सभागृहाच्या पटलावर ती स्वीकारावी लागते.
- त्यानंतर लोकसभा अध्यक्ष त्या प्रस्तावावर चर्चेसाठी वेळ आणि तारीख निश्चित करतात.
- अविश्वास प्रस्तावार मतदान होत असताना जर विरोधकांचं बहुमत दिसलं तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
- स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 27 वेळा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला गेलाय, बहुतांश वेळा तो बहुमतानं फेटाळलं गेलाय.
- अपवाद 1979 मध्ये मोरारजी देसाई आणि 1999 मध्ये वाजपेयींच्या सरकारचा आहे.
ही बातमी वाचा :