Legal App Launch: आता एका क्लिकवर मिळणार कायदेविषयक सल्ला, माजी माजी सरन्यायाधीश एम.एन वेंकटचलैया यांनी लाँच केले लिगल अॅप
Legal App Launch: माजी मुख्य न्यायाधीश एम.एन वेंकटचलैया यांनी कायदेविषयक योग्य सल्ला मिळण्यास मदत करण्यासाठी एक अॅप लाँच केले आहे. यामध्ये कोणताही व्यक्ती कायदेतज्ञांशी चर्चा देखील करु शकतो.
Legal App Launch: इंडियन लिगल रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शनिवारी एक कायदेविषयक अॅप (Leagal App) लाँच करण्यात आले आहे. हे अॅप अनेक कायदेविषयक बाबींमध्ये मदत करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या अॅपचे नाव इंडियन लिगल अॅप असे आहे. तसेच हे अॅप प्रत्येक भारतीय नागरिकाला कायदेविषयक सल्ला देणार असून योग्य असे कायदेविषयक मार्गदर्शन करण्यास मदत देखील करणार आहे. माजी सरन्यायाधीश एम.एन वेंकटचलैया (M. N. Venkatachaliah) यांनी हे अॅप लाँच केले आहे.
या अॅपचे प्रमुख उद्दिष्ट नागरिकांना कायदेविषयक मदत करण्याचे आहे. तसेच या अॅपमुळे नागरिकांना कायदेतज्ञांसोबत चर्चा देखील करता येणार आहे. या अॅपमध्ये गोपनीयतेचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. सध्या तरी हे अॅप 6 भारतीय भाषांमध्ये लाँच करण्यात आले आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली आणि पंजाबी या भाषांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे हे अॅप तुम्हाला अनेक अडचणींच्या वेळेस देखील वापरता येणार आहे. जर एखाद्या अडचणीच्या वेळेस पोलिसांना पोहचण्यास उशीर झाला तर, अशावेळी या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला कायदे मित्राशी संपर्क साधता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला चोवीस तास मदत केली जाणार आहे. तसेच ही सेवा तुम्हाला अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होणार आहे. हे अॅप अगदी सहज तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करु शकता. तसेच या अॅपच्या माध्यमातून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ही आहेत या अॅपची वैशिष्ट्ये
- या अॅपमुळे तुम्हाला तुमच्या फोनवर कायदेविषयक सल्ला मिळणार आहे.
- अंत्यंत वाजवी दरामध्ये तुम्ही कायदेतज्ञांसोबत ओडिओ किंवा व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून संपर्क साधू शकता.
- कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज तयार करायचे असल्यास तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.
- तुम्ही या अॅपसाठी वार्षिक शुल्क भरल्यास तुम्हाला काही कायदेविषयक सेवा देखील उपलब्ध होतील.
- तसेच या अॅपच्या माध्यमातून कायदेविषय माहिती आणि देखील उपलब्ध करुन देणार आहे, जेणेकरुन नागरिकांना कायदेविषयक काय माहिती आहे हे जाणून घेण्यास मदत होईल.
- तसेच या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कायदेविषयक सल्ला मिळण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
GPay, PhonePe किंवा Paytm वापरत असाल तर हे काम आताच करा, प्रायव्हसी होईल आणखी सुरक्षित!