एक्स्प्लोर

Deesa Airbase : पाकिस्तान सीमेजवळ भारत उभारणार नवीन एअरबेस, डीसा एअरबेस 'या' दृष्टीने असेल खास

New Gujarat airbase near Pakistan : गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे नवा एअरबेस उभारण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत हे एअरफोर्स स्टेशन पूर्णपणे तयार होईल.

PM Modi on Deesa Airbase : पाकिस्तानकडून (Pakistan) सीमेवर कुरापती सुरुच असतात. यावर लक्ष ठेवत पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेलगत नवीन एअरबेस (India New Airbase) म्हणजे हवाई तळ उभारत आहे. गुजरातमधील (Gujrat) बनासकांठा जिल्ह्यातील डीसा (Deesa) येथे नवा एअरबेस (Airbase) उभारण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत हे एअरफोर्स स्टेशन (Deesa Air Force Station) पूर्णपणे तयार होईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी गांधीनगरमध्ये (Gandhinagar) आयोजित डिफेन्स एक्सपो 2022 (Defense Expo 2022) मध्ये डीसा एअरबेसची (Deesa Airbase) पायाभरणी केली. पुढील दोन वर्षांमध्ये डीसा हवाई तळ भारताचं नवं एअरफोर्स स्टेशन बनून तयार होईल, अशी माहिती यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली.

पाकिस्तान सीमेजवळ भारताचा नवा 'डीसा एअरबेस'

गुजरातमधील गांधीनगर येथील डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'केवळ एक मजबूत देशच जागतिक स्तरावर आपची मजबूत छाप पाडू शकतो. यासाठी आपली व्यावसायिक क्षमता वाढवण्याबरोबरच उच्च दर्जाची उपकरणं आणि तंत्रज्ञानावर भर देणं गरजेचं आहे. वेळोवेळी देशाच्या लष्कराने आपली उपस्थिती दाखवत उपयुक्तता सिद्ध केली आहे.' 

डीसा एअरबेससाठी एक हजार कोटींचा खर्च

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे नवीन एअरबेस बांधण्याची घोषणा केली. गुजरातचा भूजमध्ये आधीच एअरबेस आहे. आता डीसा येथे नवा एअरबेस उभारण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Def Expo 2022 मध्ये डीसा येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन एअरबेसची पायाभरणी केली. आता भारतीय हवाई दलासाठी (IAF) नवीन संरक्षण एअरबेस उभारण्यास सुरूवात होईल. 

डीसा एअरबेस 'या' दृष्टीने असेल खास

  • दक्षिण पश्चिमी एअर कमांडसाठी मोक्याचे स्थान
  • महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचं
  • एअरबेस बांधण्यासाठी एक हजार कोटींची गुंतवणूक
  • हवाई दलाच्या ऑपरेशनल रेंजमध्ये विस्तार
  • भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त 130 किमी अंतरावर 

केंद्र सरकारने नवीन एअरबेस उभारण्याचा निर्णय 2020 मध्ये घेतला होता. यासाठी सुमारे 1,000 कोटी रुपये खर्च येईल. नवा डीसा एअरबेसच्या रनवेवर बोईंग सी-17 ग्लोबमास्टरसह नवीन आधुनिक लढाऊ विमानांचं परिक्षण आणि सराव करण्यात येईल. डीसा एअरबेस भारताचं एअरफोर्स स्टेशन असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget