एक्स्प्लोर
नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच, केंद्राचं RTI ला उत्तर
![नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच, केंद्राचं RTI ला उत्तर Netaji Subhas Chandra Bose Died In Plane Crash Centre In Rti Reply नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच, केंद्राचं RTI ला उत्तर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/14212134/Netaji-Subhas-Chandra-Bose.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचा सस्पेन्स दूर होत आहे. नेताजींचा मृत्यू विमान अपघातातच झाल्याची माहिती भारत सरकारने दिली. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते सायक सेन यांनी ही याचिका दाखल केली होती. त्याला गृहमंत्रालयाने उत्तर दिलं आहे. नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी झाला होता, असा स्पष्ट उल्लेखही उत्तरात केला आहे.
आरटीआयमध्ये दिलेल्या उत्तरामुळे नेताजींचं कुटुंब नाराज झालं आहे. "हे वर्तन अतिशय बेजबाबदारपणाचं आहे. प्रकरण अजून उलगडलेलं नाही, तरीही केंद्र सरकार अशाप्रकारचं उत्तर कसं काय देऊ शकतं?," असा प्रश्न नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांनी विचारला आहे.
"भारत सरकारने नेताजींच्या मृत्यूसंबंधित 37 फाईल्स जारी केल्या होत्या. त्यात पृष्ठ क्रमांक 114 ते 122 वर याची माहिती दिली आहे," असंही उत्तरात म्हटलं आहे.
शिवाय उत्तरात शाहनवाज समिती, न्यायमूर्ती जी.डी. खोसला आयोग आणि न्यायमूर्ती मुखर्जी आयोगाच्या अहवालाचा हवाला दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)