एक्स्प्लोर

NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक

देशातील नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुन्हा नव्याने नीट परीक्षा घेण्यात आली. या री- युजी नीट परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला.

संभाजीनगर : नीट-यूजी (NEET) निकालावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण, बीडमधील (Beed) दोन विद्यार्थ्यांनी एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेवरच आरोप केले आहेत. एका विद्यार्थ्याला 522 गुण अपेक्षित असताना स्कोअरकार्डवर अवघे 95 गुण मिळाले, तर दुसऱ्या विद्यार्थिनीला 702 पेक्षा अधिक गुण अपेक्षित असताना केवळ 87 गुण मिळाल्याचा दावा करण्यात आला. या निकालानंतर पालक न्यायासाठी हायकोर्टात (court) जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा परीक्षेच्या 'नीट'नेटकेपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. 

देशातील नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर पुन्हा नव्याने नीट परीक्षा घेण्यात आली. या री- युजी नीट परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर झाला. देशात आणि राज्यात अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी सेलीब्रेशन सुरू झाले. मात्र, बीडच्या सोहम गवतेच्या कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. उत्तरपत्रिका आणि अँसर की तपासल्यानंतर 522 गुण मिळतील, अशी खात्री असलेल्या सोहमच्या स्कोअरकार्डवर मात्र अवघे 95 गुण दिसले. निकाल पाहिल्यानंतर काही वेळ तो कोणाशीच बोलला नाही आणि गवते कुटुंबीयांच्या घरात अश्रूंचा बांधच फुटला.

मुलाने रात्रंदिवस अभ्यास केला, अनेकदा दोन-तीन तासांपेक्षा जास्त झोप घेतली नाही. वेळेवर जेवणही केलं नाही... आजारी पडला तरी अभ्यास थांबवला नाही. पण, निकालाने सगळ्याच मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना सोहमच्या आईने व्यक्त केली. तर, वडिलांनी ओएमआर शीट आणि अँसर की तपासल्यानंतर मोठी तफावत आढळल्याचा दावा करत, न्याय न मिळाल्यास थेट हायकोर्टात जाणार असल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

ज्ञानेश्वरी पवारचेही स्वप्न भंगले

विशेष म्हणजे हा प्रकार एकट्या सोहमबाबतच घडला असं नाही, हे प्रकरण त्याचं एकाचं नाही. तर, बीडच्या वडवणीतील ज्ञानेश्वरी पवार हिची कहाणीही तितकीच धक्कादायक आहे. अँसर कीनुसार तब्बल 702 गुण मिळतील, या विश्वासाने एम्स दिल्लीचं स्वप्न पाहणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या स्कोअरकार्डवर मात्र केवळ 87 गुण दिसले, आणि एका क्षणात टॉपर होण्याचं ज्ञानेश्वरीचं स्वप्न चक्काचूर झालं. मुलीने वर्षभर दिवसाचे 18-18 तास अभ्यास केला, अनेकदा जेवणही टाळलं. फक्त डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांसमोर ठेवलं. पण निकालाने त्या स्वप्नांवर पाणी फेरलं, अशी व्यथा ज्ञानेश्वरीच्या आईने मांडली. ओएमआर शीटमध्ये तफावत असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांची मूळ ओएमआर शीट प्रत्यक्ष दाखवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

एनटीएच्या मुल्यांकनावरच प्रश्नचिन्ह

दरम्यान, पेपरफुटीनंतर आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट परीक्षेला आता गुणांतील कथित तफावतीची भर पडली आहे. बीडमधील दोन विद्यार्थ्यांच्या तक्रारींमुळे एनटीएच्या मूल्यांकन प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का... आणि एनटीए या आरोपांवर काय उत्तर देणार... याकडे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा

NEET Results: 'नीट'चा पुन्हा बोजवारा; ज्ञानेश्वरीला अँसर कीनुसार 700 प्लस, पण प्रत्यक्षात फक्त 87 गुण, आईचा आक्रोश, विद्यार्थीला रडू

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget