Sharad Pawar : शरद पवार गटाला मोठा दिलासा, लोकसभा अध्यक्षांनी बहाल केली 'या' व्यक्तीला खासदारकी
NCP Crisis : निवडणूक आयोगासमोरील सुनावणीच्या आधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला असून पाठिंबा देणाऱ्या एका खासदाराची संख्या वाढली आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे लक्ष्यद्विपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faizal) यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी त्यांना पुन्हा देण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल केली. या संबंधी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभा अध्यक्षांना तीन वेळा पत्र लिहिलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोर्टाच्या आदेशानंतर खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र कोर्टाने पुन्हा एकदा त्यांना खासदारकी बहाल केली. पण न्यायालयाच्या आदेशानंतरही फैजल यांची खासदारकी बहाल करण्यात येत नव्हती. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील वीस दिवसात तीन वेळा लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. न्यायालयाच्या आदेशानंतरही लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणात दिरंगाई केल्याने सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Grateful to @ombirlakota ji for reinstating Mohammed Faizal PP as a Lok Sabha MP, following the directions of the Hon’ble Supreme Court. The people of his Lakshadweep Parliamentary Constituency can finally breathe a sigh of relief, knowing that their elected representative is… https://t.co/W1a6e1TXGw pic.twitter.com/63pPNmogPd
— Supriya Sule (@supriya_sule) November 2, 2023
न्यायालयाने खासदारकी परत देण्याचा दिला होता आदेश
राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिलासा दिला होता. कोर्टाने त्यांच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा करण्याचे आदेश दिले होते. मात्र केरळ उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी करताना फैजल यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द केलं होतं.
कोर्टाने 10 ऑक्टोबरच्या सुनावणी वेळी हे देखील स्पष्ट केलं होतं की, मोहम्मद फैजल हे आपल्या लक्ष्यद्विप लोकसभेचं कामकाज पाहू शकतील. असं असताना देखील लोकसभा सचिवालयाने 14 दिवस उलटून देखील मोहम्मद फैजल यांची खासदारकी त्यांना पुन्हा देऊ केलेली नाही. याची आठवण करुन देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं.
फैजल यांच्यावर आरोप काय आहेत?
खासदार मोहम्मद फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. कावारत्ती सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फैजल यांनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने फैजल यांना दोषी ठरवलं आहे.
शरद पवार गटाकडे खासदारांची संख्या अधिक
निवडणूक आयोगात सध्या पक्ष आणि चिन्ह कुणाचं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचा लढा सुरु आहे. लोकसभेत सद्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे. श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे खासदार आहेत. तर मोहम्मद फैजल यांची खासदारकी परत मिळाल्यानंतर शरद पवार गटाच्या खासदारांची संख्या वाढली आहे.
ही बातमी वाचा: