Multibagger Stock: पाच वर्षात 15 रुपयांचा स्टॉक 18851 रुपयांवर, 1 लाखांचे 12 कोटी बनले, पेनी स्टॉकमुळं गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Stock: हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरची किंमत 2020 मध्ये 15 रुपयांवर होता. आज तो शेअर 18851 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या पाच वर्षात शेअरमध्ये 1937.35 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Multibagger Penny Stock मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. जेव्हा राजनैतिक तणाव वाढलेला असतो तेव्हा जोखीम अधिक असते. शेअर बाजारात तेजी आणि घसरण सुरु असते, त्याचा गुंतवणूकदारांवर परिणाम होत असतो. यामुळं गुंतवणूक करताना किंवा एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंदर्भातील सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे. आज आपण हिताची एनर्जी इंडिया या कंपनीच्या स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत. या कंपनीच्या स्टॉकनं गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये जोरदार रिटर्न दिले आहेत.
शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
हिताची एनर्जी इंडियाच्या शेअरची किंमत 2020 मध्ये 15 रुपये होते. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर म्हणजेच एनएसईवर आज या स्टॉकमध्ये ट्रेडिंग 19030 रुपयांना सुरु झालं. बाजार बंद झाला तेव्हा शेअरमध्ये घसरण होऊन तो 18851 रुपयांवर पोहोचला आहे. पाच वर्षात या शेअरमध्ये 1967 टक्के वाढ झाली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं पाच वर्षांपूर्वी हिताची एनर्जी इंडियाचे 1 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले असते तर आज त्याचं मूल्य 12 कोटीपेंक्षा अधिक झालं असतं.गेल्या वर्षभरात स्टॉकमध्ये 63.67 टक्क्यांची वाढ झाली आहे. म्हणजे या स्टॉकनं दीघकाळासाठी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. या शेअरनं गुंतवणूकदारांना सातत्यानं चांगला परतावा दिला आहे. आज या स्टॉकनं 19030 रुपयांपर्यंत उच्चांक गाठला होता.
पहिल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी
30 जून 2025 संपलेल्या पहिल्या तिमाहीत हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडचा निव्वळ नफा 1163 टक्क्यांनी वाढून 131.6 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 10.42 कोटी रुपये होता. कंपनीचा ऑपरेशन रेवेन्यू गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत 1327 कोटी रुपयांच्या 11.4 टक्क्यांनी वाढून 1479 कोटी रुपयांवर पोहोचला. ऑपरेशनल लेवलवर EBITDA या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 224 टक्क्यांनी वाढून 155 कोटी रुपये आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)



















