एक्स्प्लोर

महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार यावं, खासदार नवनीत राणांची इच्छा

महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार बनावं, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं आहे. मोदींकडून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचं कौतुक करणं बरंच काही सांगून जात आहे. पवार आणि मोदी यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात सत्तास्थापना करावी, असे त्या म्हणाल्या.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला दिसत नाही. नेमकं कुणाचं सरकार येणार याबाबत अजूनही चित्र स्पष्ट दिसत नसताना आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं अशी इच्छा बोलून दाखवली आहे. नवनीत कौर राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, राष्ट्रवादी आणि भाजप अशा नव्या समीकरणाची चर्चा काही दिवसांपूर्वी होत होती. मात्र नंतर अशी चर्चा बंद झाली. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार बनावं, असं नवनीत कौर राणा यांनी म्हटलं आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं आहे. मोदींकडून राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचं कौतुक करणं बरंच काही सांगून जात आहे. पवार आणि मोदी यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात सत्तास्थापना करावी, असे त्या म्हणाल्या.
शिवसेनेवर केली टीका नवनीत कौर राणा यांनी यावेळी शिवसेनेवर जोरदार टीका केली. बेईमान लोकांमुळे आज महाराष्ट्रात अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीआधी शिवसेना-भाजप एकत्र होते. मात्र आता महत्वाकांक्षा वाढल्यामुळे शिवसेनेने भाजपची साथ सोडली आहे, असेही त्या म्हणाल्या. लोकसभेत देखील नवनीत राणा यांनी शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप केला. तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते असं सांगत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. हे ही वाचा - सत्ता स्थापनेबाबत चर्चा नाही, आघाडीतील मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही : शरद पवार 120 आमदारांचा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा दावा कसा सोडेल नवनीत कौर राणा म्हणाल्या की, लोकांनी निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या युतीला मतदान केलं. आज भाजपकडे 120 आमदार आहेत. यात 105 भाजपचे आणि 15 अपक्षांचा समावेश आहे. अशी स्थिती असताना शिवसेना मुख्यमंत्री पदाची मागणी करत आहे. 120 आमदारांचा पाठिंबा असणारी भाजप मुख्यमंत्रीपदाचा दावा कसा सोडेल? असा सवाल त्यांनी केला. 56 आमदार असताना शिवसेना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बघत आहे, असेही त्या म्हणाल्या. लोकसभेतही नवनीत राणा आक्रमक आज, लोकसभेत बोलताना देखील नवनीत राणा या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. शिवसेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असल्याचा आरोप केला. तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याची भावना असेल तर मी स्वत:चं घरही पेटवू शकते असंही त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात जो ओला दुष्काळ पडला आहे, राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो शिवसेनेचा आहे. जर शेतकऱ्यांवर इतकं प्रेम आणि सहानूभुती आहे तर मग तिथे सरकार स्थापन करायचं होतं. शिवसेनेने स्वत:चा स्वार्थ आणि घराचा विचार केला, असे नवनीत राणा म्हणाल्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
पेट्रोलची चिंता संपणार? लवकरच 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सुरु होणार, सरकारनं आखली मोठी योजना
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
LPG सिलेंडरसाठीचा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? फसवणूक टाळण्यासाठी सरकारनं उचललं पाऊल
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget