एक्स्प्लोर
पुढील वर्षापासून गंगा स्वच्छतेसाठी महाअभियान, किनाऱ्यावरील 4 हजार गावं स्वच्छ करणार

इलाहाबाद : गंगा स्वच्छता अभियानाचं पहिलं पाऊल म्हणून मोदी सरकारने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील पाच राज्यांमधील तब्बल 4 हजार गावं स्वच्छ करण्याचं मिशन हाती घेतलं आहे. या मिशनअंतर्गत या गावांमध्ये प्रत्येक घरात शौचालय बांधून दिलं जाणार आहे.
केंद्रीय मंत्री उमा भारती आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी गंगा किनाऱ्यावरील चार हजारहून अधिक गावांमधील ग्रामप्रधान, ब्लॉक प्रमुख आणि इतर लोकप्रतिनिधींना इलाहाबादमधील एका कार्यक्रमात गंगेच्या स्वच्छतेची शपथ दिली. गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्याचं अभियान यशस्वी करण्यासाठी आपापलं गाव स्वच्छ करण्याचं आवाहनही केंद्रीय मंत्र्यांकडून करण्यात आलं आहे.
गंगा किनाऱ्यावर उघड्यावर शौच करण्यापासून रोखण्यासाठी आणि किनाऱ्यावरील नागरिकांना जागृत करण्यासाठी केंद्र सरकारने इलाहाबादमध्ये पाच राज्यांचे मंत्री, प्रमुख सचिव, 52 जिल्ह्यांचे डीएम आणि जवळपास चार हजार ग्राम प्रधानांवर एक वर्कशॉप आयोजित केला होता. गंगा स्वच्छतेआधी किनाऱ्यावरील गावं स्वच्छ करणं आवश्यक असल्याचं मत या वर्कशॉपमध्ये सांगण्यात आलं.
इलाहाबादमध्ये शहीद चंद्रशेख आझाद स्मारकस्थळावर झालेल्या शपथ आणि संकल्प कार्यक्रमात केंद्रीय मंत्री उमार भारती यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपापलं गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतरच पुढल्या वर्षीपासून गंगा स्वच्छता अभियानाचं काम सुरु केलं जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
