एक्स्प्लोर

PM मोदी आज करणार उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन, जाणून घ्या काय आहे खास?

PM Modi Inaugurate Mahakal Corridor : नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

PM Modi Inaugurate Mahakal Corridor : भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन (Ujjain) येथे स्थित महाकालेश्वर मंदिर (Mahakaleshwar Temple) आहे. पुराणातही या मंदिराचा महिमा सांगण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 11 ऑक्टोबर रोजी महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन करतील, ज्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम 2023-24 पर्यंत पूर्ण होईल.

महाकाल कॉरिडॉरमुळे उज्जैनला नवी ओळख मिळणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ते उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेणार आहेत आणि पूजा करणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. महाकाल कॉरिडॉरच्या उभारणीने धर्मनगरी उज्जैनला नवी ओळख मिळणार आहे. महाभारत, वेद आणि स्कंद पुराणातील अवंतीखंडात भगवान शंकराच्या ज्या कथा वर्णन केल्या आहेत, त्या कथा आता जिवंत होणार आहेत. याचे कारण महाकालेश्वर मंदिराच्या नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात या कथा दर्शविणाऱ्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. महाकवी कालिदास यांनीही मंदिर भावनिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. एक काळ असा होता जेव्हा उज्जैन हे भारतीय वेळेच्या गणनेचे केंद्र होते आणि महाकाल ही उज्जैनची प्रमुख देवता मानली जात असे. 

महाकाल प्रांगणात सुमारे 200 लहान-मोठ्या मूर्ती
आपल्या देशातील कारागीर शतकानुशतके अशी शिल्पे बनवत आहेत, जे पाहून जग थक्क झाले आहे. नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात हीच श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. प्रांगणात लहान-मोठ्या अशा सुमारे 200 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शिल्पे तयार करणाऱ्या कलाकारांनी याआधी व्यापक संशोधन केले आहे. त्यात पुरातनता आणि आधुनिकता या दोन्हींचे मिश्रण आहे. 

महाकाल पथावर 108  स्तंभ
महाकाल प्रांगणात 108 खांब तयार करण्यात आले आहेत. याचे कारण म्हणजे सनातन धर्मात 108 हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यावर भगवान भोलेनाथ आणि शक्ती यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. याशिवाय कार्तिकेय आणि गणेशाची मूर्तीही कोरलेली आहे. 20.25 हेक्टरमध्ये बांधलेली सुमारे 920 मीटर लांबीच्या महाकाल प्रांगणात बसवलेली शिल्पे त्यांचीच कहाणी सांगतील. त्यासाठी पुतळ्यासमोर केलेला बारकोड स्कॅन करावा लागणार आहे. 2019 पासून पुतळे बनवण्याचे काम सुरू झाले. महाकाल पथावर 108  स्तंभ आहेत. या स्तंभांवर शंकराच्या आयुष्यावर आधारित विविध शिल्प साकारण्यात आली आहेत. मोदी जेव्हा उद्घाटनासाठी पोहचतील तेव्हा 600 साधू मंत्रोच्चार आणि शंखनाद करतील. कॉरिडोरच्या प्रवेशद्वारावर 20 फूट उंच धाग्यापासून शिवलिंग तयार करण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget