2050 पर्यंत 44 कोटी भारतीय होणार लठ्ठपणाचे शिकार, अहवालात धक्कादायक माहिती, पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केली चिंता
2050 पर्यंत 44 कोटींहून अधिक भारतीय हे लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात, अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

National Health Day : 2050 पर्यंत 44 कोटींहून अधिक भारतीय हे लठ्ठपणाचे शिकार होऊ शकतात, अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे. आज राष्ट्रीय आरोग्य दिनानिमित्त एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय नागरिकांमध्ये दिवसेंदिवस लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. अशातच अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2050 पर्यंत 44 कोटींहून अधिक भारतीय लठ्ठपणाचे शिकार होतील अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येकाने सक्रिय आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळं लठ्ठपणा वाढतोय
बदलणाऱ्या खाण्यापिण्याच्या सवई आणि बदलते जीवनमान यामुळं लठ्ठपणाच्या समस्या वाढत आहेत. बदलती जीवनशैली ही शरीरासाठी घातल ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वात जास्त युवा वर्ग लठ्ठपणाचा शिकार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लठ्ठपणामुळं अनेक आजार होऊ शकतात, त्यामुळं वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम करणं शरीरासाठी अत्यंत गरजेचं असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. स्वत: जर फिट राहिलात तर देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देता येईल त्यामुळं अॅक्टीव आणि हेल्दी राहा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
विविध कारणांमुळं वाढतोय लठ्ठपणा?
आजच्या काळात वारंवार जंक फूड, व्यायाम न करणे, सतत मोबाईल, अपूर्ण झोप, या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या शरीरात स्थूलपणा तसेच चरबीचे प्रमाण वाढत चाललंय. लठ्ठपणा ही भारतीयांमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या बनत आहे. लठ्ठपणामुळे तुमच्या शरीराचे व्यक्तिमत्व तर बिघडतेच शिवाय अनेक आजारही होतात. लठ्ठपणामुळे एखादी व्यक्ती फॅटी लिव्हर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि कर्करोग यांसारख्या घातक आजारांनाही बळी पडू शकते. जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी चांगल्या ठेवल्या तर तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता. लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी, आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहार समाविष्ट करणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
Health : फक्त खाणंच नाही, तर तासन्तास मोबाईलवर स्क्रोल केल्यानेही लठ्ठपणा येतो? काय आहे Digital Obesity? डॉक्टरांकडून समजून घ्या...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























